Ticker

6/recent/ticker-posts

वडसा-गडचिरोली रेल्वे लाईनच्या बांधकामाची मा. खा.अशोक नेते यांच्याकडून पाहणी.....


रेल्वेचा महत्वाकांक्षी  प्रकल्प  पूर्णत्वास जात असल्याचा पाहुन आनंद व्यक्त केला.

 
राकेश आसोले चित्रा न्युज 
गडचिरोली  :मागील दहा-पंधरा दिवसापासून आलेल्या सततच्या पावसामुळे व अतिवृष्टी होऊन आलेल्या पावसाच्या पुरामुळे वडसा-गडचिरोली रेल्वे लाईनचे बांधकाम खोळंबले होते.पण आता पाऊस ओसरल्याने रेल्वे लाईनच्या कामाला गती वाढविण्यासाठी आज दिं.०६ ऑगस्ट २०२४ रोज मंगळवारी अडपल्ली- गोगांव या ठिकाणच्या रेल्वे लाईनच्या कामाची पाहणी केली.तसेच गडचिरोली जिल्ह्यात रेल्वेमार्गाचे जाळेविस्तारण्यासाठी पुढाकार घेणारे माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चा चे अशोक नेते यांनी वडसा-गडचिरोली या महत्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पाच्या कामाला भेट देऊन या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी सदर कामात असलेल्या काही अडचणी दूर करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याची ग्वाही त्यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिली. 

तसेच रेल्वेचा महत्त्वाकांशी प्रोजेक्ट पूर्णत्वास जात असल्याचा पाहून आनंद व समाधान व्यक्त केले.

यावेळी सोबत रेल्वेचे वरिष्ठ खंड अभियंता आर.पी.सिंग,मॅनेजर अरुणजी जैन,चंद्रकांत सराटे, भाजपा नेते दत्तुजी माकोडे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या