Ticker

6/recent/ticker-posts

तळेगाव दशासर येथे गप्पी मासे धडक मोहीम

हर्षवर्धन देशभ्रतार चित्रा न्युज
अमरावती :प्रा.आ.केंद्र तळेगाव दशासर व राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण उपपथक तळेगाव दशासर, ता.धामणगाव रेल्वे, जि.अमरावती यांच्या मार्फत दि.16 ऑगस्ट 2024 रोजी तळेगाव दशासर गावामध्ये कायमस्वरूपी व तात्पुरत्या डासोत्पत्ती स्थानांमध्ये हिवताप, हत्तीरोग, डेंग्यू, चिकन गुनिया या किटकजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी विविध ठिकाणी गप्पी मासे सोडण्यात आले.
               जैविक उपायोजनेअंतर्गत किटकजन्य आजार नियंत्रणाकरीता अळीभक्षक गप्पी माशांचा वापर करण्यात येतो. साचलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडल्यास ते डासांच्या अळ्यांचे भक्षण करून डासाची घनता कमी करण्यास मदत करतात. गप्पी मासे सर्व प्रकारच्या डास अळ्यांचे भक्षण करतात त्यामुळे हिवताप व हत्तीरोग निर्मूलन कार्यक्रमांमध्ये मदत म्हणून ही मोहीम राबविल्या जाते अशी माहिती व आरोग्य शिक्षण देण्यात आले.
          ही मोहीम मा.उपसंचालक डॉ.कमलेश भंडारी, मा.सहायक संचालक श्रीमती डॉ.राधा जोगी, मा.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.दिलीप सौंदळे, मा.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश आसोले, मा.जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.शरद जोगी, मा.हत्तीरोग अधिकारी श्री.दिनेश भगत, डॉ.जुनेद व मा.तालुका आरोग्य अधिकारी डॉ.हर्षल क्षीरसागर, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.विवेक सुदेवाड, डॉ.सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.
      गप्पी मासे धडक मोहीम यशस्वी करण्यासाठी आरोग्य निरीक्षक श्री.आर.टी.दुधकवरे, श्री.जी.आर.गुडधे, आरोग्य कर्मचारी श्री.विनय भुरे, श्री.संतोष राठोड, श्री.राहुल भोसले, श्री.अमित वाघ, नियमित क्षेत्र कर्मचारी श्री.हरिदास इंगळे, श्री.भूषण वठ्ठे, श्री.गजानन इंगोले यांनी विशेष परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या