Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हा परिषद शाळेत शाळा व्यवस्थापन समितीचे गठन

पालक सभेत शैक्षणिक गुणवत्तेवर झाली चर्चा

रवी भोंगाने साकोली
साकोली : शहरातील ब्रिटिशकालीन व सन १८६० पूर्वीच्या स्थापित "हायटेक" असलेली जिल्हा परिषद केंद्र उच्च प्राथ. शाळा क्र. १ गणेश वार्ड येथे शनिवार १७ ऑगस्टला पालक सभेचे आयोजन झाले. यामध्ये जूनी शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन करून नवी कार्यकारिणीचे गठन करण्यात आले. व पालक सभेला मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर विशेष चर्चासत्राही संपन्न झाले. 
      आयोजित पालक सभेला मंचावर से.नि. मुख्याध्यापक आर. बी. तिडके, माजी अध्यक्ष प्रकाश कोवे, उपाध्यक्ष रीना चचाने, सदस्य अमित लांजेवार, सचिन डुंभरे, ज्योती गजापूरे आदी उपस्थित होते. झालेल्या नविन शाळा व्यवस्थापन समिती पालकवर्गातून निर्वाचित करण्यात आली. या नविन कार्यकारिणीत अध्यक्ष हेमंत भारद्वाज, उपाध्यक्ष हिमा राऊत, सदस्यगणांत डि. डि. वलथरे, आशिष चेडगे, शिक्षिका शालिनी राऊत, दिलीप झोडे, शिशुपाल क-हाडे, भागवत लांजेवार, रिता शहारे, पूनम मेश्राम, वैशाली कापगते, दिपाली राऊत, ए. ए. लांजेवार यांचा समावेश आहे. सर्व नवनियुक्त कार्यकारिणींचे माजी सदस्य, पालकवर्ग आणि शिक्षकांकडून अभिनंदन करण्यात आले. येथे पालक सभेत मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चेत मुख्याध्यापक डी. डी. वलथरे यांनी सांगितले की, या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला उच्च शिक्षणांसोबतच शारीरिक, बौद्धिक व सामान्य ज्ञान मध्ये वाहतुक नियमांचे पालन, शासकीय योजनांची अंमलबजावणी कशी होते, शिक्षण क्षेत्रातील मुलांसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी, मैदानी खेळातातील पुर्वसराव अश्या अनेक प्रकारचे आमच्या शिक्षकवृंदांकडून मुलांना यांचे देखील मार्गदर्शन करण्यात येते, जेणेकरून विद्यार्थी सर्वगुणसंपन्न असावा हाच शासकीय जिल्हा परिषद शाळेचा वसा आहे असे प्रतिपादन केले. 
        आयोजित पालक सभेला संचालन शिक्षक टि. आय. पटले व एम. व्ही. बोकडे यांनी केले. शाळा व्यवस्थापन समिती निवड प्रक्रिया व पालक सभेला सहाय्यक शिक्षक चेतन बोरकर, बलविर राऊत, चित्ररेखा इंगळे, आरती कापगते आणि शालेय पोषण आहार समितीचे रेषमा कोवे, कविता बावणे, छन्नू मडावी यांनी विशेष स्वागत आयोजनार्थ सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या