Ticker

6/recent/ticker-posts

निःशुल्क महाआरोग्य शिबिरात १७०० रुग्णांनी केली तपासणी

करडी येथे आमदार राजू कारेमोरे यांचे आयोजन

कालिदास खोब्रागडे,चित्रा न्युज 
 भंडारा :- तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे आणि मित्र मंडळाव्दारे सोमवार(ता.५ ऑगस्ट) रोजी स्व. नामदेवजी भडके मंगल कार्यालय करडी येथे निःशुल्क भव्य महाआरोग्य व रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात १ हजार ७०० रुग्णांनी आपली तपासणी करून घेतली. त्यापैकी ६५० रुग्णांना चष्म्याचे वितरण करण्यात आले. तर २४१ रुग्णांना मोफत शस्त्रक्रियेसाठी नागपूर येथे पाठविण्यात आले. करडी व परिसरातील जनतेने या महाआरोग्य शिबिरास उत्तम  प्रतिसाद दिल्याचे आमदार राजू कारेमोरे यांनी सांगितले. 
                       आमदार राजू कारेमोरे आणि मित्र मंडळाव्दारे सोमवारी करडी येथे निःशुल्क महाआरोग्य व रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी माजी जि.प. सदस्य वासुदेव बांते, उदघाटक करडी च्या सरपंच नीलिमा इलमे, विशेष अतिथी जिल्हा परिषद सदस्य महादेव पचघरे, पंचायत समिती सभापती रितेश वासनिक, पंचायत समिती सदस्य प्रीती शेंडे, पोलिस उपनिरीक्षक डोंगरे, प्राचार्य मोटघरे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष सदाशिव ढेंगे, महेंद्र शेंडे, डॉ. युवराज जमईवार, योगेश सिंगनजुडे महादेव बुरडे, सागर गभने, करडी चे उपसरपंच यशवंत गायधने, चंदू सेलोकर, संजय कावळे, पत्रकार भूपेंद्र पवनकर, युवराज गोमासे, राजू तुमसरे, भोजराम तिजारे, सामाजिक कार्यकर्ता यादोराव मुंगमोडे, राजेंद्र शेंद्रे, श्रीकांत डोरले, भूपेंद्र साठवणे, राजू सोयाम, वामन चकोले, अजय शेंडे, विजय बांते, धम्मदिप कोटांगले, नाझिम पठाण, चानाक्षी आगासे, प्रतिमा नंदेश्वर, ज्ञानेश्वर घावले, वच्छाला सेलोकर आणि गावकऱ्यांचे प्रमुख  उपस्थितीत पार पडला. या निःशुल्क महाआरोग्य व रोगनिदान शिबिरात १ हजार ७०० रुग्णांची तपासणी करण्यात आली. ६५० नेत्र रुग्णांना चष्म्याचे वाटप करण्यात आले. तर २४१ रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात आले. या महाआरोग्य शिबीरास जनतेने अभुतपूर्व प्रतिसाद दिल्याचे आमदार राजू कारेमोरे यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या