विठ्ठल पाटील लातूर
लातूर :-दि.९ रोजी सुरु झालेले एम.एच.५५ हे उदगीरचे आर.टी.ओ.कार्यालय म्हणजे असुन अडचण_नसुन वळंबा असेच म्हणावे लागेल.कारण,हाळी - हंडरगुळी येथे 2 , 4 चाकी वाहनांसह ट्रॅक्टर,ट्रक,टमटम,अॅटो यासारखी कांही वाहने मुदतबाह्य झाली आहेत. तसेच हाळीतील लाकडी अड्ड्यावर लाकडे आणणारे बहूतांश ट्रॅक्टर व ट्रक यांची एक्सपायरी डेट संपली तरी ही बिनधास्तपणे धावतात.आणी या मार्गे अधून-मधून ये-जा करणारे आर.टी.ओ.महाशयाने या मुदतबाह्य वाहनांवर एकदाही कार्यवाही केली नाही.म्हणुन येथे मुदतबाह्य गाड्यांची चलती मोठ्याप्रमाणात दिसुन येते.तर कार्यवाहीसाठी व्हॅन मधून उतरुन कधी येणार आर.टी.ओ.जमिनीवरती असा प्रश्न जनतेतून विचारला जातोय
उदगीरला आरटीओ कार्यालय झाले यामुळे आतातरी विनापरमीट तसेच नंबर नसलेल्या आणी मुदत संपलेली तरीही सुसाट धावणा-या लहान,मोठे अशा सगळ्या वाहनांवर कार्यवाही होईल.अशी आशा जनतेला होती.पन म्हणतात ना कशाचे अन् फाटक्यात पाय,अशी गत उदगीरच्या परिवहन कार्यालयाची बनली आहे.कारण या बाबतीत आवाज उठवुन ही यामार्गे सुसाट धावणा-या आरटीओ व्हॅन मधील एकही महाशय अशा वाहनां- वर कार्यवाहीसाठी व्हॅनच्याखाली उतरायची डेअरींग केल्याचे दिसत नाही.यामुळे येथे कांही 2 , 4 चाकी सह ट्रक,ट्रॅक्टर,अॅटो,टमटम,टेंम्यो यासारखी शेकडो वाहने एक्सपायरी डेट संपुन जमाना झाला तरीही या मार्गे सुसाट धावताना दिसतात.यात कांही अॅटो मधून प्रवाशांची तसेच कांही ट्रक,ट्रॅक्टर मधून लाकडांची अवैध वाहतूक दिनदहाडे होत असते. तसेच नंबर नसलेल्या कांही गाड्याही सुसाटपणे धावताना दिसतात.यातील कांही गाड्या चोरीच्या ही असण्याची शक्यता नाकारता येत नाही.कारण शो रुम मधून बाहेर पडलेल्या गाड्यां ना अवघ्या कांही दिवसातच नंबर येतो.माञ येथे अशा कांही गाड्या आहेत त्या कित्येक महिण्यापासुन विनानंबरच्या पळताना दिसतात.तर कांही बाईक्सना फॅन्सी नंबर दिसतात आणी अशा प्रकारच्या वाहणांची या ठिकाणी मोठ्याप्रमाणात *चलती* आहे.तेंव्हा अशा वाहनांवर कारवाही करण्यासाठी आर.टी.ओ.महाशय हे कधी येणार जमिनीवरती ? असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे .. तेंव्हा आर.टी.ओ.च्या अॅक्शन,रिअॅक्शन कडे हाळी-हंडरगुळी परिसराचे लक्ष लागले आहे ..


0 टिप्पण्या