रवी भोंगाने साकोली
साकोली:-ग्रामीण भागातून गमन केलेला आणि शहरी गुन्हेगारीच्या जगात स्थिरावलेला सराईत गुन्हेगारी जगताचा बादशाह विलास गणवीर म्हणजेच लखोबा लोंखडे याचे गुन्हेगारी जगतातले एक नवे प्रकरण समोर आले आहे. विविध विभागाचा अधिकारी सांगून नोकरीच्या नावावर फसवणूक करणारा विलास गणवीर हा सतरा बायकांचा दादला असल्याचे नवे कथानक समोर आले आहे. इंग्रजी, हिंदी आणि मराठी अशा तिन्ही भाषेवर प्रभुत्व असलेला विलास गणवीर याने एकूण १७ महिलांची फसगत केल्याचे प्रकरण तपासात निष्पन्न झाले. आतापर्यंत १७ बायकांचा दादला असलेला विलास गणवीर यांचे वय जरी ६५ असले तरी १७ बायकांचा दादला असल्याने त्याच्या वयाचीही ४२० पणा समोर आला आहे. २००४ मध्ये साकोली येथील पोलीस स्टेशनमध्ये एका प्रकणात आणले असता आणि तत्कालीन पोलीस निरीक्षक यांनी त्याची उलट तपासणी केली असता त्यावेळी ६ बायकांचा दादला असल्याची नोंद झाली होती. तसे वृत्त देखील त्यावेळी अनेक प्रसिद्धी माध्यमांनी प्रकाशित केले होते हे त्याहून विशेष. साकोली तालुक्यातील किन्ही ( मोखे) येथील रहिवासी असलेला विलास गणवीर वयाच्या २१ व्या वर्षीपासून गुन्हेगारी जगात प्रवेश केला. गावातील शिक्षकालाच त्याने प्रथम टोपी दिली. तेथून विलास गणवीर याने , " तो मी नव्हेच " या नाटकातील लखोबा लोखंडे या पात्रात प्रवेश केला. बुद्धीने तल्लख असलेला विलास गणवीरला याचवेळी १९६० निर्मित अत्रे यांचे तो मी नव्हेच हे नाटक त्याच्या हातात लागले असावे. तेव्हापासून त्याने अनेकांना गंडविण्याचे सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले. विविध पोलीस स्टेशनमध्ये आणि विविध कलमांखाली अनेक गुन्हे दाखल असलेला विलास गणवीर हा बुद्धीने चतुर असून एका खून प्रकरणी गुन्ह्याची नोंद लाखांदूर पोलीस स्टेशनमध्ये आहे. एखाद्याची परिपूर्ण माहिती काढणे आणि त्यानंतर त्याची शिकार करणे हा त्याच्या गुन्हेगारी जगातील छंद.संपूर्ण आयुष्य गुन्हेगारी जगतात घालवणारा विलास गणवीर हा सध्या डुगीपार पोलीस स्टेशनच्या आत आहे. ग्रामीण भागातून गेलेला आणि गुन्हेगारी जगतात डॉन बनलेला विलास गणवीर मूळचा साकोली तालुक्यातील किन्ही ( मोखे ) गावचा. जवळपास जवळील डुग्गीपार, सडक अर्जुनी पोलिसांना गुप्त माहिती मिळालेल्या माहितीनुसार मौजा खोडशिवनी रेल्वे स्टेशन परीसरात एक व्यक्ती औरंगाबांद पोलीस दलात पोलीस शिपाई या पदाकरीता नोकरीचे आमिष देवुन फसवणुक करतांना संशयीतरित्या कागदपत्रासह आढळुन आल्याने त्याला डूग्गीपार पोलिसांनी नुकत्याच बेड्या ठोकल्यात. फिर्यादीचे तक्रारीवरुन आरोपी विलास नारायण गणवीर रा. किन्ही/मोखे यांचे विरुध्द पोलीस ठाणे डुग्गीपार येथे अपराध क्रमांक २७७/२०२४ कलम २०४, २०५, ३१९(२), ३१८(४), ६२, ३३६(३) भा.न्या.स २०२३ अन्वये दाखल करण्यात आला आहे.


0 टिप्पण्या