कालिदास खोब्रागडे, चित्रा न्युज
भंडारा :- ग्रामपंचायत कार्यालय अड्याळ येथे नायब तहसीलदार कार्यालय व ग्रामपंचायतीचे संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा ७८वा वर्धापन दिन उत्साहात पार पडला. ध्वजारोहण नायब तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी शुभदा चित्तरंजन धुर्वे मॅडम यांच्या हस्ते पार पडला. प्रमुख अतिथी जिल्हा परिषद सदस्य सुवर्णा शिवशंकर मुंगाटे, प. स. सदस्य सीमा गिरी, सरपंच शिवशंकर मुंगाटे, ग्रामविकास अधिकारी पौर्णिमा शहारे(साखरे) मॅडम, मंडळ अधिकारी नत्थु शेंडे, पुष्पम लिमजे, तलाठी शरद गाढवे, आर. एस. बांबोळे, निशा नागदेवे, महसूल सहायक आर. ए
नागपुरे, वाय. बी. अंबादे, उपसरपंच शंकर मनापुरे , तं.मु.स.अध्यक्ष नरेंद्र अंबादे सर्व ग्रा. प. सदस्य, वरिष्ठ लिपिक रामाजी न्यायमूर्ती, सर्व कार्यालयीन कर्मचारी, सर्व शैक्षणिक संस्था, पोलिस पथक, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका मदतनीस, सर्व ग्रामवसी बंधू-भगिनी उपस्थित होते. सर्व प्रथम अतिथिंच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर नायब तहसिलदार श्रीमती शुभदा धुर्वे यांच्या हस्ते राष्ट्रीय तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण पार पडल्यानंतर पोलिस पथकाद्वारे सलामी देण्यात आली. नंतर सर्व उपस्थितांनी राज्यगीत म्हटले, कार्यक्रमाचे संचालन माजी सरपंच तथा माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष मुनीश्वर बोदलकर यांनी केले. त्यापूर्वी गुजरी चौक अडयाळ येथील ध्वजारोहण ग्रामपंचायत सदस्य मनोरमा मडावी यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाचे समारोप सर्व ग्रामवसियाना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा सरपंच शिवशंकर मुंगाटे यांनी देवून ग्रामपंचायत हॉल येथे समारोप केला.


0 टिप्पण्या