Ticker

6/recent/ticker-posts

स्वातंत्र्य दिनी सेवानिवृत्त सीआरपीएफ जवानांचा सत्कार

• सावरी ग्रामपंचायतीचा स्तुप्त्या उपक्रम 

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- ७८ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सावरी/मुरमाडी ग्रामपंचायतीचे सरपंच सचिन बागडे यांचे संकल्पनेतून गावातील केंद्रीय राखीव पोलीस दलात २३ वर्षे सेवा देऊन सेवानिवृत्त झालेले जवान चीतेश नत्थु मनी यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. तसेच सावरी येथील अभ्यासिका केंद्रातून सतीश सूर्यवंशी या विद्यार्थ्याची जलसंपदा विभाग पुणे येथे नियुक्ती झाल्याने त्याचाही शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शालेय विद्यार्थ्यांची राष्ट्रीय गीत व नृत्यगायन केले. यावेळी सरपंच सचिन बागडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. उपसरपंच मंगेश धांडे, ग्रामपंचायत सदस्य आदित्य बागडे, मोहन रेहपाडे, भोजराज मांढरे, रीना बागडे, पुष्पा वंजारी, सुरेखा चाचेरे, सिंधू नान्हे, वंदना मेहर व कर्मचारी तसेच शालेय विद्यार्थी, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या