रवी भोंगाने साकोली
साकोली:-स्थानिक फार्मसी महाविद्यालयात वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्था द्वारा संचालित, बाजीरावजी करंजेकर कॉलेज ऑफ फार्मसी येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग तर्फे सदर कार्यक्रम घेण्यात आला. महाविद्यालयाच्या औषधी वन बागेत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना विभागातील विद्यार्थी स्वयंसेवक सहभागी झाले होते. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. आतिश शहारे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये रा.से.यो. विभाग प्रमुख प्रा. दिनेश पणपलिया, रा.से.यो.विभाग सहाय्यक प्रा. संतोष गोटेफोडे, वृषभ अग्रवाल यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद सहभागी झाले होते. सदर कार्यक्रमासाठी संस्था संस्थापक अध्यक्ष डॉ. ब्रह्मानंद करंजेकर तर संस्था अध्यक्ष डॉ. सोमदत्त करंजेकर यांचे सहकार्य लाभले.


0 टिप्पण्या