विजय चौडेकर नांदेड जिल्हा प्रतिनिधी चित्रा न्यूज
नांदेड :- आगामी गणेशोत्सव महोत्सवाच्या पार्श्वभुमीवर गणेशत्सोव पूर्वतयारीच्या कामांचा दिनांक २७.०८.२०२४ रोजी महापालिकेत *मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे* यांनी आढावा घेतला. नांदेड शहरात स्थापित होणाऱ्या गणेश मुर्तीच्या विसर्जनासाठी विविध प्रकारच्या सोई-सुविधा महापालिकेतर्फे उपलब्ध करुन देण्यात येतात, याचाच आढावा या बैठकीत आयुक्तांनी घेतला
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्यासह उपआयुक्त कारभारी दिवेकर, उपआयुक्त स.अजितपालसिंघ संधु, शहर अभियंता सुमंत पाटील, कार्यकारी अभियंता शिवाजी बाबरे, कार्यकारी अभियंता संघरत्न सोनसळे, सहाय्यक आयुक्त गुलाम मो.सादेक, संजय जाधव, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रईसोधीन, क्षेत्रिय अधिकारी डॉ. मिर्झा फरहतुल्ला बेग, रमेश चवरे, रावण सोनसळे, संभाजी कास्टेवाड, अग्निशमन अधिकारी के. जी. दासरे, उपअभियंता व्यंकटेश गोकुळे, भांडार अधिक्षक नागनाथ पतंगे आदींची उपस्थिती होती.
शहरात श्रीगणेश स्थापनेचे ठिकाण, श्रीगणेश मुर्तीची उंची, विसर्जनाचे ठिकाण व मंडळाचे अध्यक्षाचे नांव व भ्रमध्वनी क्रमांक इत्यादी माहिती संकलीत करुन माहिती सादर करण्यासाठी सर्व क्षेत्रिय अधिकारी यांना यावेळी आदेशीत करण्यात आले आणि क्षेत्रिय कार्यालय निहाय मुर्ती संकलन केंद्र स्थापन करण्याचे आदेश यावेळी आयुक्तानी क्षेत्रिय अधिकाऱ्यांना दिले आहेत.
तसेच मिरवणुक मार्गावरील खड्डे बुजवुन, विसर्जनाच्या ठिकाणी रस्ता तयार करुन बॅरीगेटींग करण्यासह लहान व मध्यम आकाराच्या गणेश विसर्जन करण्यासाठी सांगवी (आसना नदी), पासदगांव (आसना नदी) येथे कृत्रिम तलाव तयार करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागास सुचित करुन विसर्जनाच्या दिवशी मुर्ती संकलन करुन कृत्रिम तलावात विसर्जनासाठी आवश्यकतेनुसार लागणारे टेम्पो, क्रेन व इतर आवश्यक वाहने यांत्रिकी विभागा मार्फत उपलब्ध करुन देण्याच्या सुचना यावेळी देण्यात आल्या आहेत.
गणेशत्सोव काळात गणेश स्थापणा ते विसर्जनाच्या कालावधीत विशेष मोहिम राबवुन साफसफाई बाबत दक्ष राहुन निर्माल्य संकलनासाठी विशेष व्यवस्था करण्याच्या सुचना यावेळी स्वच्छता विभागास आयुक्तांनी केल्या आहेत. गोदावरी व आसना नदीच्या विविध घाटांवर श्रीगणेश विसर्जाच्या पूर्वी मनपाच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांव्दारे विशेष स्वच्छता अभियान राबविण्यासाठी सुध्दा आयुक्तांनी आदेशीत केले आहे.
तसेच विसर्जानाच्या दिवशी संगणक विभागाने विसर्जन मार्गावर व मुख्य चौकात CCTV कैंकॅमेरांची व्यवस्था
करावी, आरोग्य विभागाने ॲम्बुलन्स व प्राथमिक उपचार तर विद्युत विभागाने विसर्जनाच्या ठिकाणी विद्युत रोशनाई तसेच लाऊड स्पिकरची व्यवस्था करण्याच्या सुचना यावेळी देण्यात आल्या. सामान्य प्रशासन विभागाने गोदावरी व आसना नदीच्या विविध घाटांवर नागरिकांकडुन गणेश मुर्ती व निर्माल्य संकलन करण्यासाठी दोन सत्रात कर्मचाऱ्यांनी नियुक्ती आदेश निर्गमित करण्याच्या सुचना यावेळी देण्यात आल्या आहेत. तसेच कृत्रिम तलाव, खदान आणि नदीघाटावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिवरक्षकांची नियुक्ती करण्यासाठी आयुक्तांनी आदेशीत केले आहे


0 टिप्पण्या