🌞 दिन विशेष 🌞
इसवी सन २०२४ - २८ ऑगस्ट
शालिवाहन शक १९४६, विक्रम संवत २०८०
भा. रा. ६ भाद्रपद १९४६
युगाब्द ५१२६
संवत्सर नाम : क्रोधी
अयन : दक्षिणायण
ऋतू : वर्षा
मास: श्रावण
पक्ष: कृष्ण
तिथी: दशमी (२५.२०) ~ एकादशी
वार: बुधवार
नक्षत्र: मृग (१५.५०) ~ आर्द्रा
राशी: मिथुन
*बुध पूजन*
श्रीकृष्ण सरस्वती पुण्यतिथी, कोल्हापूर.
१८४५:’सायंटिफिक अमेरिकन’ मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.
१९३७:’टोयोटा मोटर्स’ ही स्वतंत्र कंपनी बनली. जपानची जपानी बहुराष्ट्रीय ऑटोमोटिव्ह निर्मिती कंपनी ‘टोयोटा मोटर्स’ ची स्थापना करण्यात आली.
१९८६: भाग्यश्री साठे बुद्धिबळ ग्रँडमॅस्टर बनणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या.
१९९०: इराकने कुवैत हा आपलाच एक प्रांत असल्याचे जाहीर केले.
जन्मदिवस :
१७४९: जर्मन महाकवी, कलाकार, लेखक आणि राजकारणी, योहान वूल्फगाँग गटे.
१८९६:रघुपती सहाय ऊर्फ फिराक गोरखपुरी – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ऊर्दू शायर.
१९०६: रंगभूमी अभिनेते चिंतामणी गोविंद तथा मामा पेंडसे
१९०८: विनायक माधव तथा ’विमादी’ पटवर्धन दीक्षित – विनोदकार
१९१३: भोपाल रियासतच्या राजकुमारी व भारतातील पहिल्या महिला वैमानिक आबिदा सुल्तान.
१९१८: राम कदम, प्रसिद्ध संगीतकार.
१९२६: पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित माजी पोलिस सेवा अधिकारी, गुप्तचर विभाग प्रमुख तसचं, सिक्किम, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश राज्याचे माजी राज्यपाल टी. व्ही. राजेश्वर
१९३४: सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षा सुजाता मनोहर
१९६५: पोकेमन चे निर्माते सातोशी ताजीरी
१९६६: प्रिया दत्त, माजी खासदार
मृत्यूदिन :
१६६७:जयपूरचे राजे, मिर्झा राजे जयसिंग
१९६९: रावसाहेब पटवर्धन, स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत
१९९०: चित्रपट अभिनेत्री सुमित्रा देवी
२००१:व्यंकटेश दिगंबर माडगूळकर – लेखक, चित्रकार, पटकथाकार व शिकारी
*।। दास-वाणी ।।*
वाल्मीकें जेथें तप केलें ।
ते वन पुण्यपावन जाले ।
शुष्क काळी अंकुर फुटले ।
तपोबळेॆ जयाच्या ।।
पूर्वी होता वाल्हा कोळी ।
जीवघातकी भूमंडळी ।
तोचि वंदिजे सकळीं ।
विबुधी आणि ऋषेश्वरीं ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
दासबोध : १६/०१/१०-११
आधी वाल्या कोळी या नावाने दुष्ट घातकी दरोडेखोर म्हणून प्रसिद्ध होता. नारदमुनींनी केलेल्या उपदेशाने त्याला उपरती झाली. दुष्कृत्यांचा त्याने कायमस्वरूपी त्याग केला. वाल्या घोर तपश्चर्येला रानामधे जाऊन बसला. रामनामाच्या अखंड जपामधे कित्येक वर्षे गेली. अंगावर मुंग्यानी वारूळ केले तरी हा अविचल होता. वारूळाला वाल्मिक म्हणतात.
ज्या अरण्यामधे त्याने रामजप केला तेथील भूमी पवित्र बनली. प्रत्येक सुकलेल्या खोडालाही तपोबळाने पुन्हा पालवी फुटून ते शुष्क अरण्य पुन्हा हिरवेगार बनले. वाल्मिकी या नावाने प्रसिद्ध झालेला हा महान ऋषी पुढे असंख्य विद्वान आणि ऋषीमुनींनाही वंदनीय ठरला. रामायण या अद्भुत ग्रंथाच्या लिखाणामुळे अखिल जगताला वंदनीय ठरलेल्या वाल्मिकीमुनीना माझा भावपूर्वक नमस्कार!
*वाल्मिकिस्तवन समास*
*संकलक : सुधीर देशपांडे (आबा)*
🙏 💐💐💐💐 💐 🙏


0 टिप्पण्या