रवि भोंगाने साकोली
साकोली:- महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. दिवाळीपर्यंत या निवडणुकांचा राजकीय शिमगा होईल. तूर्त निवडणुकीची घोषणा व्हायला उशीर असला तरी साकोली विधानसभा क्षेत्रात राजकीय हालचाली सुरू झाल्याचे दिसून येते. सध्या तरी भाजप पक्ष आघाडीवर आहे. ज्या पद्धतीने भाजपचे उपक्रम राबविणे सुरू आहे. त्यानुसार साकोली विधानसभा क्षेत्रात भाजपचे संभाव्य उमेदवार कोण असा प्रश्न विधानसभा क्षेत्रात सुरू आहे. लाखांदूर येथे नुकतीच तालुका कोअर कमिटीची बैठक पार पडली. १५ ऑगस्टला लाखांदूर येथे विधान परिषदेचे सदस्य आमदार परिणय फुके यांच्या मार्गदर्शनात कार्यकर्ता मेळावा पार पडत आहे. त्यामुळे सहाजिकच भाजपच्या हालचाली सुरू झाल्याचे दिसून येत आहे. सध्या तरी ज्या पद्धतीने भाजप तर्फे उपक्रम राबविणे सुरू आहे. त्यानुसार वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष डॉ. सोमदत्त करंजेकर, भाजपा जिल्हा अध्यक्ष प्रकाश बाळबुध्ये, माजी आमदार बाळा काशीवार, आमदार परिणय फुके यांच्या नावाची हवा विधानसभा क्षेत्रासाठी हायजॅक ठरू लागली आहे. डॉ. सोमदत्त करंजेकर आणि प्रकाश बाळबुध्ये हे दोन नवीन चेहरे भाजपा समोर आहेत. त्यात माजी आमदार बाळा काशीवर दुसऱ्यांदा रिंगणात राहू शकतात ? सध्या तरी भाजपा सोडून कुठल्याही पक्षाचे संभाव्य नावे समोर आली नाहीत. परंतु भाजपकडून ज्याप्रमाणे पक्षाची ध्येय धोरणे राबविले जात आहेत. त्यामुळे काँग्रेस पुढे आव्हाण ठरणार तर नाही ना हा एक प्रश्न आहे. तिकडे तिन्ही तालुक्यात ज्याप्रमाणे भाजपचे संभाव्य उमेदवार मतदार आणि कार्यकर्त्यांकडे जात आहेत. त्यानुसार भाजपने आतापासून कंबर कसलेली दिसून येते. सर्वात म्हणजे भाजपची एक गोष्ट बघायला मिळते ती अशी की, शासन निर्णय जाहीर केलेल्या प्रत्येक योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते सोशल मीडियावर आघाडीवर दिसून येत आहेत. लोकसभा निवडणुकीत खासदार प्रशांत पडोळे यांना साकोली विधानसभा क्षेत्रात २७,००० हजारची लीड मिळाली. परिणामी भाजप उमेदवारांसमोर सुद्धा एक आव्हान ठरणार आहे हे नक्की. याचा धसका भाजपने घेतला तर नाही ना ? आगामी निवडणुक रोमांचक होणार हे नक्की. फक्त भाजपकडून साकोली विधानसभा क्षेत्राचे संभाव्य शिलेदार कोण ?


0 टिप्पण्या