Ticker

6/recent/ticker-posts

दिव्यांग प्रमाणपत्र आणि ओळखपत्रासाठी विशेष शिबिरे आयोजित


संजय देशमुख चित्रा न्युज
सोलापूर -: सोलापूर जिल्ह्यात दिव्यांगत्व प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र देण्याकरिता विशेष मोहिम शिबिरे आयोजित केली जात आहेत. जिल्ह्यातील दिव्यांगांची संख्या 1,15,755 असून, त्यातील 68% ग्रामीण आणि 32% शहरी भागातील आहेत. मित्राचे संचालक अभिजीत राऊत यांनी या मोहिमेत 27 कार्यशाळांद्वारे 3742 प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण दिल्याची माहिती दिली.

आरोग्य यंत्रणा, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, समाज कल्याणचे अधिकारी, स्वयंसेवी संस्था आणि मिशन इन्स्टिट्यूट फॉर ट्रेनिंग रिसर्च अँड ॲक्शन (मित्रा) यंत्रणांच्या सहकार्याने हे शिबिरे यशस्वी करण्यासाठी समन्वय साधण्याची अपेक्षा श्री. राऊत यांनी व्यक्त केली.

शिबिर वेळापत्रक:

1. पंढरपूर:1342 लाभार्थी, ग्रामीण रुग्णालय, पंढरपूर, 19-20 ऑगस्ट 2024, सोमवार- मंगळवार, 9 ते 3.
2. अक्कलकोट: 1532 लाभार्थी, ग्रामीण रुग्णालय, अक्कलकोट, 22-23 ऑगस्ट 2024, गुरुवार- शुक्रवार, 9 ते 3.
3. बार्शी: 1357 लाभार्थी, ग्रामीण रुग्णालय, बार्शी, 26-27 ऑगस्ट 2024, सोमवार- मंगळवार, 9 ते 3.
4. माळशिरस: 1720 लाभार्थी, ग्रामीण रुग्णालय, माळशिरस, 29-30 ऑगस्ट 2024, गुरुवार- शुक्रवार, 9 ते 3.
5. सांगोला: 1803 लाभार्थी, ग्रामीण रुग्णालय, सांगोला, 2-3 सप्टेंबर 2024, सोमवार- मंगळवार, 9 ते 3.
6. करमाळा: 1629 लाभार्थी, ग्रामीण रुग्णालय, करमाळा, 5-6 सप्टेंबर 2024, गुरुवार- शुक्रवार, 9 ते 3.
7. मोहोळ: 1841 लाभार्थी, ग्रामीण रुग्णालय, मोहोळ, 9, 10, 12 सप्टेंबर 2024, सोमवार, मंगळवार, गुरुवार, 9 ते 3.
8. माढा: 1292 लाभार्थी, ग्रामीण रुग्णालय, कुर्डूवाडी, 13-14 सप्टेंबर 2024, शुक्रवार- शनिवार, 9 ते 3.
9. मंगळवेढा: 808 लाभार्थी, ग्रामीण रुग्णालय, मंगळवेढा, 17-19 सप्टेंबर 2024, मंगळवार- गुरुवार, 9 ते 3.
10. सोलापूर दक्षिण: 1294 लाभार्थी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सोलापूर, 20-21 सप्टेंबर 2024, शुक्रवार- शनिवार, 9 ते 3.
11. सोलापूर उत्तर : 561 लाभार्थी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सोलापूर, 23 सप्टेंबर 2024, सोमवार, 9 ते 3.

लाभार्थ्यांनी आपले अर्ज वेळेत भरून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या