Ticker

6/recent/ticker-posts

आरोग्य कर्मचारी युनियन महासंघाची कार्यकारिणी गठित

कालिदास खोब्रागडे, चित्रा न्युज
भंडारा :- जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी युनियन महासंघ भंडारा ची विशेष सभा विनोद राठोड यांचे अध्यक्षतेखाली राज्य सल्लागार व मानद अध्यक्ष महासंघ भंडारा अतुल वर्मा यांचे सुचनेनुसार औषध निर्माण अधिकारी संघटना भंडारा चे अध्यक्ष धर्मेंद्र शेंडे, सचिव घनश्याम सावरबांधे, सुधांशू नेवारे यांचे प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद व पंचायत समिती कर्मचारी सहकारी पत संस्था भंडारा येथे शनिवार(ता.३ ऑगस्ट) रोजी आयोजित करण्यात आली होती. त्यात उपस्थित आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संमतीने नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली. त्यात अध्यक्ष विनोद राठोड, उपाध्यक्ष प्रवीण राठोड, सचिव मनोज लोहारे, कोषाध्यक्ष प्रमोद फोपसे, संघटक केवलचंद मांढरे, प्रसिध्दी प्रमुख होमराज बनसोड, मार्गदर्शक शिवशंकर ढोबळे, मुकेश कठाने, सल्लागार धर्मेंद्र शेंडे, घनश्याम सावरबांधे, चंदा झलके, सदस्य दिनेश राठोड यांची सर्वसंमतीने निवड करण्यात आली. या विशेष सभेला बहुसंख्येने आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. या निवडीबद्दल जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे राज्य सल्लागार अतुल वर्मा, जिल्हाध्यक्ष शिवपाल भाजीपाले, जिल्हा सचिव ताराचंद बोरकर तथा पदाधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या