आरोग्य केंद्राची नविन वेळ निश्चित करण्यासाठी ॲड प्रशांत चंदनशिव यांची मागणी..
सोनू संजीव क्षेत्रे चित्रा न्युज
उल्हासनगर :-पूर्व येथील छत्रपती संभाजी चौक येथे सुरू करण्यात आलेले आरोग्यवर्धिनी केंद्र ची वेळ दुपारी २ ते रात्री १० अशी दिली आहे . केंद्राची वेळ दुपारी असल्या कारणाने जे रुग्ण आहे ,ते सकाळी उल्हासनगर ४ येथील शासकीय प्रसुतीगृह व दवाखाना तसेच उल्हासनगर ३ येथील सेंट्रल हॉस्पिटल येथे सकाळ ची असलेले OPD येथे रुग्ण जात आहेत.
नागरिकांच्या घरा जवळ सुरू झालेले आरोग्य केंद्र त्यांचा कामात येत नाही.त्यामुळे त्याचा उपयोग होत नाही व त्या केंद्र मध्ये रुग्ण जाताना दिसून येत नाही.
तरी आरोग्य केंद्राची वेळ ही सकाळी ८ ते दुपार ४ अशी करण्या करिता मागणी समाजसेवक ॲड प्रशांत चंदनशिव यांनी केली असून तसे निवेदन आरोग्य अधिकारी धर्मा मॅडम यांना दिले आहे. जेणे करू नागरिकांना घरा जवळ असलेल्या आरोग्य के केंद्राचा लाभ मिळेल .


0 टिप्पण्या