राकेश आसोले चित्रा न्युज
नवी मुंबई :- नवी मुंबई चे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांचे नाव वापरून पुण्यातील २५ वर्षीय तरुणाची १० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. आरोपींनी मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीचे बहाण्याने खोटे कागदपत्र दाखवून तरुणाकडून पैसे उकळले. विश्रामबाग पोलीस ठाण्यात तरुणाने तक्रार दाखल केली असून, ३ व्यक्तींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फसवणुकीची घटना ३ जून ते ३ ऑगस्ट दरम्यान घडली. फेडेक्स कुरिअर कंपनीच्या नावाने मुंबई क्राईम ब्रांचचे अधिकारी असल्याचे सांगून तरुणाला फोन आला होता. आरोपींनी इराणला पार्सल पाठवल्याचा खोटा दावा करून तरुणाला धमकावले आणि खोटे ओळखपत्र दाखवून फसवणूक केली.
मिलिंद भारंबे, पोलीस आयुक्त नवी मुंबई, यांचे नाव वापरून ही फसवणूक करण्यात आल्याचे उघड झाले आहे.


0 टिप्पण्या