स्पर्धेत सहभागी होण्याचे डॉ. सोमदत्त करंजेकर यांचे आवाहन
रवी भोगाने साकोली
साकोली:- देवशयनी आषाढी एकादशीचे निमित्य साधून साकोली येथे तालुकास्तरीय भजन स्पर्धेचे भव्यदिव्य आयोजन करण्यात आले आहे. १६ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट २०२४ दरम्यान वैनगंगा शैक्षणिक परिसर येथे सकाळी १० वाजता ते सायंकाळी ६ वाजता पर्यंत ही स्पर्धा पार पडणार आहे. सदर स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी ७००१ रोख,मानपत्र ,स्मृतीचिन्ह द्वितीय क्रमांकासाठी ५००१, तृतीय क्रमांकासाठी ३००१आणि भजन स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक चमूला ५०० रुपये रोख आणि प्रमाणपत्राचा समावेश आहे.भजन स्पर्धेसाठी काही नियमावली घालण्यात आली असून भजन स्पर्धेत सहभागी नोंदणीसाठी आणि माहितीसाठी ताराचंद लंजे मो.क्र.९७६४०६१२७५, सोनू बडवाईक मो. क्र.७३८५९३००३३ आणि प्रणय बडवाईक ८८८८३१९३४७ यांच्याशी संपर्क साधने आहे.
या स्पर्धेचे भव्य दिव्य आयोजन वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्था अध्यक्ष डॉ. सोमदत्त ब्रह्मानंद करंजेकर यांनी केले असून या स्पर्धेत बहुसंख्य भजन मंडळांनी सहभागी होण्याचे आवाहान देखील त्यांनी यावेळी केले आहे. विशेष म्हणजे यापूर्वी या स्पर्धेचे तालुकास्तरीय आयोजन लाखनी आणि लाखांदूर येथेही करण्यात आले.


0 टिप्पण्या