Ticker

6/recent/ticker-posts

या बैठकीत मान्यवरांनी येणाऱ्या विधानसभेत विजयाचा संकल्प केला...


भारतीय जनता पार्टी जिल्हा चंद्रपुर ची जिल्हा बैठक डॉ. शामाप्रसाद मुखर्जी वाचनालय  चंद्रपुर येथे विस्तृत संघटनात्मक बैठक संपन्न...


दिक्षा पाटील चित्रा न्युज
गडचिरोली :-भारतीय जनता पार्टी  जिल्हा चंद्रपुर ची जिल्हा बैठक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय चंद्रपुर या ठिकाणी दि.२७ ऑगस्ट रोजी  विस्तारित भाजपा कार्यकारिणी व भाजपा पदाधिकारी तसेच कार्यकर्ते आघाड्यांसह संघटनात्मक बैठक 
गडचिरोली / चंद्रपुर जिल्हा प्रभारी म्हणून आलेले अनुसुचित जाती/जनजाती सांसदीय समितीचे अध्यक्ष तथा  माजी केंद्रीय मंत्री *_मान.श्री. फग्गनसिंह कुलस्ते, यांच्या अध्यक्षतेखाली  संपन्न झाली. या बैठकीला वने मंत्री   मा.ना.श्री.सुधीरभाऊ  मुनगंटीवार,मागासवर्गीय आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष  तथा माजी केंद्रीय मंत्री  मा.हंसराज भैया अहीर, व  माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चा चे अशोकजी नेते  व जिल्हाध्यक्ष हरिश भैया शर्मा ,_* यांच्या प्रमुख मार्गदर्शनातील व मोठ्या संख्येनी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हा बैठक पार पडली.

या बैठकीचे समारोप करतांना मा. ना.श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी बोलतांना म्हणाले संघटनेमध्ये काम करतांना नेता,विचार,व संघटन ह्या तीन गोष्टी महत्वाचे असून येणाऱ्या विधानसभेत भाजपाचाच विजय होईल असा विश्वास गडचिरोली व चंद्रपुर जिल्हा प्रभारी म्हणुन आलेले अनुसुचित जाती/जमाती सांसदीय समितीचे अध्यक्ष मा. फग्गनसिंह कुलस्ते यांना देत श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पावन पर्वावर हे भाजपाचे संघटन समोर नेत बुथ च्या शेवटच्या पन्ना प्रमुख पर्यंत आमचे कार्यकर्ते पोहचवत संघटन करेल.कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी संघटनेचे काम करतांना संघटन कसे केले पाहिजे यावर विस्तृत मार्गदर्शन करत हमें जितना है गरिबोंके सन्मान के लिए, हमे जितना है देश भक्ती के लिए, हमें जितना है काँग्रेस के कुट निती के लिए,हमे जितना है देश को आगे बढाने के लिए, हमे जितना है देश के विकास के लिए, हमे जितना है ये संघटनोंको आगे बढाने के लिए,असे व्यक्तव्य सुधीर भाऊ यांनी समारोपीय प्रसंगी केले.

या बैठकीला जिल्हा समन्वयक म्हणुन तसेच  माजी खासदार अशोकजी नेते यांनी बोलतांना आगामी येणाऱ्या विधानसभेची तयारी व बुथ रचनात्मक संघटन तसेच नियोजन करत कार्य केले पाहिजे.भाजपा जनहित लोकाभिमुख व  विकासात्मक दुष्टीकोन ठेऊन कार्य करित असते. लोकसभेत झालेल्या पराभवाची अनेक कारणे आहेत यात विरोधक संविधान बदलविणार, महिलांन च्या खात्यात महिण्याला साडेआठ हजार रुपये देऊ असे अनेक खोट नाट आरोप करत विजय प्राप्त केला. लोकसभेत झालेल्या पराभवाची पुनरावृत्ती न करता किंंवा खचून न जाता आगामी येणाऱ्या विधानसभेत कार्यकर्ते यांनी पुन्हा जोमाने कामाला लागून विजयाचा संकल्प करा. असे व्यक्तव्य याप्रसंगी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या