Ticker

6/recent/ticker-posts

साकोलीत "पेन्शन अदालत" संपन्न

जिल्हा पेन्शनर्स असोसिएशन सेवानिवृत्त शिक्षक यांच्या विविध मागण्या


रवी भोंगाने साकोली
साकोली : भंडारा जिल्हा पेन्शनर्स असोसिएशन शाखा साकोलीच्या जिल्हा परिषद सेवानिवृत्त शिक्षकांची "पेन्शन अदालत" गुरुवार ०८ ऑगस्टला संपन्न झाली. यात त्यांचा प्रमुख मागण्यांवर पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत दिर्घ चर्चा करण्यात आली. व अधिका-यांनी मागण्यांचे पूर्तता करण्याचे आश्वासन दिले. 
       सिव्हिल वार्डातील पेन्शनर्स भवन येथे आयोजित "पेन्शन अदालत" ला प्रमुख पाहुणे पं. स. गटविकास अधिकारी पी. व्ही. जाधव, पेन्शनर्स असोसिएशन साकोली शाखा अध्यक्ष विठ्ठल गि-हेपुंजे, उपाध्यक्ष भाऊराव फुलबांधे, कोषाध्यक्ष अताउल्ला खाॅं पठाण, मार्गदर्शक रामलाल रामटेके, सहसचिव किशोर गोस्वामी, विठ्ठल मसराम, राजू रोकडे, सुशिल शामकुंवर, हु. बा. येरणे, प्रमिला सार्वे, लिला टेंभरे हे हजर होते. पेन्शन अदालतीत १) दर महिन्याच्या १ तारखेला पेन्शन मिळावी. २) महागाई थकबाकी ४% टक्के मिळण्यात यावी. ३) सेवानिवृत्त शिक्षकांची उपदान अंशराशीकरण मिळावे. ४) ८० वर्ष पूर्ण झालेल्या से. नि. शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना २०% टक्के अगावू माहे पेन्शन मध्ये लागू करावे. ५) सेवानिवृत्त कंत्राटी शिक्षकांचे मानधन मिळावे. ६) से. नि. शिक्षकांच्या व केंद्रप्रमुख यांच्या ७ व्या वेतन आयोगाचा ४ था हप्ता मिळावा. ७) दर महिन्याला पेन्शन अदालतीची तारीख निश्चित करावी. ८) केंद्र प्रमुखांचा १५% टक्के नक्षलग्रस्त प्रोत्साहन भत्ता थकबाकी मिळावी. ९) सुभाष मोतीराम भुरे वरीष्ठ से. नि. शिक्षक यांची वेतनश्रेणी थकबाकी देण्याबाबत या नऊ मागण्यांवर या पेन्शन अदालतीत गटविकास अधिकाऱ्यांसह दिर्घ चर्चा झाली. यात सदर मागण्यांची गटविकास अधिकारी यांनी पूर्तता करण्याचे आश्वासन दिले. आयोजित पेन्शन अदालतीत प्रास्ताविक आर. आर. डोंगरवार यांनी केले. तर वि. ना. गि-हेपुंजे व भाऊराव फुलबांधे यांनी विविध प्रश्न या चर्चेत मांडले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या