Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रीय आदर्श विद्यालय येथे राखी प्रदर्शनी


सचिन चौरसिया जिल्हा प्रतिनिधी नागपूर


रामटेक:- राष्ट्रीय आदर्श विद्यालय येथे विद्यार्थ्यांनी स्वत तयार केलेल्या राखीचे प्रदर्शन १७ ऑगस्टला ठेवण्यात आले होते. यात ११० विद्यार्थी  स्पर्धक म्हणून सहभाग घेतला. ६  विद्यार्थाना उत्कृष्ट राखी बद्दल स्मृतीचिन्ह देण्यात आले.
स्मृती चिन्ह स्व. स्वातंत्रता सेनानी गंगाधर जोशी सोलापूर यांचा स्मृती प्रीत्यर्थ देण्यात आले. यावेळी समाज सेवक रवीकांत जोशी, संस्था संचालक होमराज हजारे, मुख्याध्यापक राजू बर्वे, पत्रकार नत्थू घरजाळे उपास्थित होते. राहुल जोहरे व सुनंदा जांभूळकर यांनी निरिक्षण केले.
मुख्याधापक राजू बर्वे मार्गदर्शन करतांना म्हणाले की विविध्य प्रदर्शनी आयोजीत केल्याने विद्यार्थाच्या सुप्त गुणांना वाव मिळतो. राखी प्रदर्शनी आयोजना करीता अशोक खंडाइत, अरविंद कोहळे संगीता नागोसे यांनी प्रयत्न केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या