• २५ हजाराचा मुद्देमाल लंपास
• पोलिसांत गुन्हा दाखल
कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :-लाखनी येथील पोलिस ठाण्याचे हद्दीतील गूढरी शेतशिवारातील स्पन कंपनीचा सोलर वॉटरपंप ३ एचपी केबलसह चोरी झाल्याची घटना शुक्रवार(ता.२७ सप्टेंबर) रोजी उघडकीस आली. नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव मनोहर बाबुराव हटवार(५४) रा. निलागोंदी, तालुका लाखनी असे आहे. लाखनी पोलिसांनी अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास लाखनी पोलीस करीत असले तरी वृत्त लिहीपर्यंत चोराचा सुगावा लागला नव्हता.
अल्पभूधारक शेतकरी मनोहर हटवार यांनी सिंचनाची सोय व्हावी. या करिता ९० टक्के अनुदानावर स्पन कंपनीचा सोलर वॉटरपंप लावला होता. त्यातून ते शेतीला सिंचन सोय करीत असत सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने पावसाचे पाण्यामुळे सिंचन करण्याची गरज पडली नसल्यामुळे या सोलर वॉटरपंपाकडे दुर्लक्ष झाले होते. पण या सोलर वॉटर पंपाचे साहित्य व्यवस्थित आहे काय. याकडे सदर शेतकऱ्याचे लक्ष असल्यामुळे शुक्रवारी ते शेतात आल्यानंतर गुरुवारी रात्रीच्या सुमारास कोणीतरी अज्ञात चोराने सौरपंप केबलसह चोरून नेल्याने २५ हजार रुपयाचे नुकसान झाल्याची बाब निदर्शनास आल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्याचा मुलगा रफिक हटवार याचे फिर्यादी वरून लाखनी पोलिसांनी अज्ञात चोराविरुद्ध अपराध क्रमांक ३९१/२०२४ कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल केला असून पोलिस हवालदार निलेश रामटेके तपास करीत आहेत. वृत्त लिहीपर्यंत चोराचा शोध लागला नव्हता. वारंवार होणाऱ्या मोटार पंप चोरीच्या घटनांमुळे चोरट्यांना शोधण्याचे आव्हान पोलीसांसमोर उभे ठाकले आहे.


0 टिप्पण्या