सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं. 7058137098
जामखेड :- यश महादेव भोंडवे यांनी ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत परीक्षेत यश संपादन करून शाळेचे , गावाचे , तालुक्याचे नांव उज्वल केले आहे तसेच इस्त्रो येथील सहलीसाठी त्यांची निवड झाली. त्याने मिळविले यश हे शाळेतील इतर विद्यार्थी यांना प्रेरणादायी ठरेल व त्यांच्या या यशात शिक्षक , पालक यांचा सिंहाचा वाटा असून यश हा हिरा असून पुढे तो मोठा होऊन नक्कीच नाव मोठे करेल , त्याला असेच यश मिळत राहो असे प्रतिपादन उपशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी केले .
जामखेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोडेगाव येथील विद्यार्थी चि.यश महादेव भोंडवे याची डॉ. विक्रम साराभाई स्पेस सेंटर इस्रो , थुंबा केरळ शैक्षणिक सहलीसाठी जिल्हा परिषद अहमदनगर तर्फे निवड करण्यात आली असून या निमित्ताने शाळा व्यवस्थापन समिती , ग्रमपंचायत , ग्रामस्थ यांच्या वतीने त्याचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. तसेच कु.भक्ती संजय राऊत ( सहावी गटात पाचवी) ,कु.समृध्दी श्रावण कांबळे (सातवी गटात पाचवी) या विद्यार्थीनींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी घोडेगाव गांवचे सरपंच जगताप म्हणाले की, यश याचे अतिशय कमी वयात विमानात बसण्याचे स्वप्न साकार होणार आहे. त्याचा आदर्श इतरांनी घ्यावा. यावेळी यश चे वडील महादेव भोंडवे यांनी अतिशय सुंदर शब्दात मनोत गत व्यक्त केले, यावेळी म्हणाले की, मागील एक वर्षापूर्वी शाळा डबघाईला आली होती. धनवे साहेबांमुळे आम्ही मुले शाळेत ठेवली. त्यानंतर मुख्याध्यापक , शिक्षक , केंद्रप्रदुख ,यांनी मेहनत घेतली व शाळेचे रूप पालटले. आज आमच्या शाळेची शैक्षणिक गुणवत्ता ही खुपच चांगली आहे याचे श्रेय येथील शिक्षकांना असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषद
उपशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे, केंद्रप्रमुख सुरेश मोहिते, नन्नवरे साहेब, घोडेगाव चे सरपंच शरद जगताप, शा. व्य. स. अध्यक्ष बाळासाहेब कांबळे, खंडू भोंडवे, महादेव भोंडवे, मुख्याध्यापिका सुनिता
पाचेगावकर,संतोष पाटील,अनिल यादव,संजय राऊत,नितीन वराट,रिंकू ढेंगळे,प्राजक्ता घायतडक आदी मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सुनिता पाचेगावकर
व सूत्रसंचालन संजय राऊत यांनी केले तर आभार प्रदर्शन संतोष पाटील यांनी मानले.


0 टिप्पण्या