राज्यपाल महोदयांच्या दौऱ्या दरम्यान उपाययोजना
कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- राज्यपाल महामहीम सी.पी.राधाकृष्णन यांचा सोमवार दि.30 सप्टेंबर रोजीच्या नियोजित जिल्हा दौज्याच्या पार्श्वभुमीवर सुरक्षीततेच्या दृष्टीकोनातून तथा अवजड वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ नये. या करिता शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३(जुना ६) वरील वाहतूक सुरळीत राहावी. तसेच कायदा व सुव्यवस्था कायम राहावी. याकरिता वाहतुकीचे नियमन व नियोजन करणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ.संजय कोलते यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील जड-अवजड वाहतुक वळविण्याचे आदेश केले आहेत. त्यानुसार नागपूर कडून तिरोडा-गोंदिया कडे जाणारे जड अवजड वाहतुक नागपूर रामटेक-कांद्री-जांब-खापा-देव्हाडा- तेथुन पुढे, तिरोडा-गोंदिया मार्गे पुढे जातील. गोंदिया-तिरोडा अदानी प्लॅट, तुमसर कडून भंडारा नागपुर कडे जाणारी जडअवजड वाहतूक खापा चौकातून जांब-कांद्री-रामटेक मार्गे नागपुर कडे. साकोली, लाखनी कडून भंडारा नागपुर कडे जाणारी जडअवजड वाहतुक लाखनी-केसलवाडा(वाघ)-अडयाळ -पवनी मार्ग-भिवापुर-उमरेड-नागपुर कडे. नागपुर कडून देवरी कडे जाणारी जड अवजड वाहतुक नागपुर-शहापुर-सातोना- वरठी-मोहाडी-तुमसर-गोंदिया मार्ग सुरू राहतील. ही अधिसूचना दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 7:00 वाजेपासून ते दुपारी 2:00 वाजता पर्यंत अंमलात राहील. सदर अधिसूचना जिल्हाधिकारी ताघा जिल्हा दंडाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी 29 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित केली आहे.


0 टिप्पण्या