मोईन कादरी चित्रा न्युज
हिंगोली :- मा. पोलीस अधीक्षक हिंगोली श्री. श्रीकृष्ण कोकाटे साहेब यांनी जिल्हयातील सराईत गुन्हेगार व लपुन छपुन चालणारे अवैध्द धंदे बाबत कडक भुमिका घेतली आहे. तसेच गंभीर गुन्हयातील आणि चोरी, जबरी चोरी, घरफोडी व दरोडा या गुन्हयातील आरोपींना नियीमत तपासणे व त्यांचे विरुध्द कडक प्रतिबंधक कार्यवाही सुरू केली आहे.त्याचाच भाग म्हणुन गुन्हेगारांची तपासणी, अवैध्द धंदे विरुध्द कार्यवाही, फरार व पाहीजे तसेच न्यायालयाचे वारंट मधील आरोपी शोध अशा व्यापक हेतुने मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रीकृष्ण कोकाटे यांचे मार्गदर्शनात दि. १४/०९/२०२४ रोजीचे रात्री २२.०० पासुन दि. १५/०९/२०२४ चे सकाळी ०२.०० वा. पावेतो संपुर्ण जिल्हयात सर्वच पोलीस स्टेशन अंतर्गत विशेष कॉम्बींग ऑपरेशन राबविण्यात आले होते. सदर मोहीमेत मा.अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुरेश दळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. मारोती थोरात, प्र.उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन काशिकर, पो.नि. 1. श्री विकास पाटील, स्था.गु.शा., पो.नि.श्री विष्णुकांत गुट्टे, पो.नि.श्री. नरेंद्र पाडळकर, पो.नि.श्री. पो. नि.श्री. गणेश राहीरे, पो.नि. श्री मोहन भोसले, पो.नि. श्री नितीन तांबे, पो.नि.श्री कुंदन कुमार वाघमारे, पो. नि. श्री डोंगरे, पो.नि. श्री सानप, सपोनि. अनिल काचमांडे, सपोनि. राम निजरदोडे, सपोनि रामोड, सपोनि. हनुमंत भिंगारे तसेच स्थागुशा वे सपोनि. राजेश मलपिलु, सपोनि, शिवांब घेवारे, पोउपनि कपिल आगलावे, पोउपनि, विक्रम विठुबोने व सर्वच पोलीस स्टेशन मधील दुय्यम पोलीस अधिकारी व मोठ्या प्रमाणात पोलीस अंमलदार हे सहभागी झाले होते. सदर मोहीमेत जिल्हयातील एकुण (६२) टिकाणी जेथे जिल्हयाती
मोक्का मधील फरार व तडीपार आदेश झालेले तसेच फरार व पाहीजे असलेले आरोपी, रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार, तसेच मिश्र वस्ती मध्ये तपासणी करण्यात आली. सदर मोहीमेमध्ये मा. न्यायालयाकडुन वेळोवेळी समन्स निघुनही तारखेवर न्यायालयात हजर राहत नव्हते व ज्यांचे बाबत मा. न्यायालयाकडुन अटक वॉरंट निघाले होते अशा इसमांविरूध्द एकुण (१७) नॉन बेलेबल वॉरंट, (०७) बेलेबल वॉरंट, एकुण (०१) समंसची बजावणी करण्यात आली. भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ प्रमाणे (०१) इसमाविरूध्द कार्यवाही करण्यात आली, अंधाराचा फायदा घेवुन चोरीचे करण्याचे उददेशाने संशयास्पदरित्या मिळुन आलेल्या एकुण (०५) इसमांविरूध्द कलम १२२ महाराष्ट्र पोलीस कायदा व (०२) इसमांविरुध्द कलम १४२ महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. अवैच्द व्यवसायाविरुध्द एकुण (०६) कार्यवाही करण्यात आल्या. जिल्हयात सर्वच पोलीस स्टेशन अंतर्गत महत्वाचे ठिकांणी नाकाबंदी करण्यात येवुन वाहनांची कसुन तपासणी करण्यात आली असुन त्या दरम्यान मो. वा. का. प्रमाणे (१३) कार्यवाही करण्यात आली. तसेच हिंगोली जिल्हयातील बँक/ए.टि.एम. चेक करण्यात आले आहे.


0 टिप्पण्या