विठ्ठल पाटील लातूर
लातूर :-गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या..! चालला रे चालला गणपती बाप्पा चालला,बघा रे बघा गणपती बघा.!! अशा घोषणा देत हंडरगुळी (ता.उदगीर) येथील सर्व गणरायाला जडअंत:करणाने निरोप देण्यात आला.यावेळी सजविलेल्या ट्रॅक्टर मधून सर्वच मंडळांनी श्री च्या मूर्तीची भव्यदिव्य अशा मिरवणुका काढण्यात आल्या होत्या.यामुळे हळी व परिसरातील हजारो गणेश भक्तांनी विसर्जन मिरवणुक पाहण्यासाठी मेन राज्यमार्गालगत व गावातील प्रमुख रोडलगत तसेच टेरेसवर,बाल्कनीत मोठी गर्दी केली होती.गावातील सर्व मंडळाचे ट्रॅक्टर एकामागोमाग शिवाजी ज्यू.काॅलेज पासुन गणेश मुर्त्या घेऊन शिस्तीत निघाले.यामुळे हंडरगुळी सारख्या ग्रामीण भागात ही पुणे,मुंबई येथील मिरवणुकीसारखा अनुभव आला.त्यामुळे सर्वञ आनंदी व ऊत्साही वातावरण दिसत होते.
हंडरगुळी येथे 9 व्या दिवशी गणेशाचे विसर्जन करण्याची जुनी परंपरा आहे दि.14 रोजी सकाळ पासुनच गावात गणेशाला निरोप देण्यासाठी सगळ्या मंडळामध्ये लगबग सुरु होती.यामुळे लहाणांपासुन ते मोठ्यांपर्यंत हजारो गणेश भक्त भगवे वस्ञ,टोपी,रुमाल घालुन बाप्पांच्या निरोपाची ऊत्साहा मध्ये तयारी करत होते.यामुळे सबंध गावात*भगवे वादळ*आले होते.
रविवारी हंडरगुळीतील सर्व गणेशा ची आरती झाल्यानंतर विसर्जन मिरवणुकीस सुरुवात झाली.यावेळी राज्यमार्गालगतच्या शिवाजी काॅलेज समोरुन सगळ्या मंडळांचे सजवलेले ट्रॅक्टर्स बाप्पांना घेऊन एकामागोमाग निघाले.यावेळी अनेकांच्या हाता मध्ये भगवे ध्वज,भगव्यासह वेगवेगळ्या रंगाचे पेहराव केलेले व भगवी टोपी , भगवे रुमाल घातलेले हजारो लोकां- मुळे हंडरगुळीत भगवे वादळ आल्या सारखे व हंडरगुळी ऐवजी पुणे,मुंबई येथील मिरवणुक बघत आहोत की काय ! असे मनमोहक व आकर्षक वातावरण हंडरगुळीत दिसत होते .
छ.शिवाजी महाराज चौकात सर्वच मंडळाच्या पदाधिका-यांचा सत्कार व स्वागत सरपंच विजय अंबेकर,उप सरपंच बालाजी भोसले,ग्राम.वि.अ. एस.आर.कांबळे व सदस्यांनी केले .
पोलीस विभागातर्फे सपोनी.बी.एस. गायकवाड,पोउपनी.एम.के.गायकवाड, संजय दळवे,टी.टी.बळदे,अक्केमोड,कसबे सोनकांबळे आदींनी चोख बंदोबस्त ठेवला
हंडरगुळीतील बाप्पांच्या विसर्जना प्रसंगी अनुचित घटना घडू नये,म्हणुन पोलिस विभागातर्फे चोख बंदोबस्त ठेवला होता.


0 टिप्पण्या