Ticker

6/recent/ticker-posts

अवैध धंद्याविरोधात महिला सरसावल्या पुढे

 गरडा येथील प्रकार 

पोलिस प्रशासना विरोधात गावात काढला मोर्चा 

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :-लाखनी येथून ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या गरडा येथे मागील अनेक वर्षांपासून खुलेआम अवैध दारू व्यवसाय सुरू आहे. या प्रकाराने गावातील युवक अंमली पदार्थांच्या आहारी जात आहेत. त्यामुळे गावातील तसेच लगतच्या गावातील अनेक कुटुंब देशोधडीला लागली आहेत. पोलिसही बघ्याची भूमिका घेत असल्याने अवैध दारू विक्रेत्यांविरोधात महिला पुढे सरसावल्या व अवैध धंद्या विरोधात सोमवार(ता.२३ स्पटेमनेत) रोजी गावात मोर्चा काढून अवैध धंद्याविरुद्ध मोहीम मोहिम राबवून सुरू असलेले अवैध धांडे बंद करण्याची मागणी केली. 
                     गरडा येथे अवैध दारूविक्रीमुळे दारू विक्रेत्यांचे घरासमोर सायंकाळचे सुमारास जत्रा भरत असल्याने आवश्यक कामाकरिता महिलांना घराबाहेर पडणे कठीण झाले होते. तर सुशिक्षित बेरोजगारांसह शाळकरी विद्यार्थिही व्यसनाधिन होण्याचे मार्गावर असल्याने पालकवर्गात चिंतेचे वातावरण पसरले असले तरी पोलिस विभाग अवैध दारूविक्री बंद करणे सोडून ठराविक दिवशी येऊन हप्ते घेऊन निघून जात असत. त्यामुळे अवैध दारू विक्रेत्यांची हिम्मत वाढून आपले कोणी काही बिघडवू शकत नाही, या तोऱ्यात वावरत असत. दारूविक्रीस कोणी विरोध केल्यास त्याला दमदाटी करण्यास मागेपुढे पाहत नसत. या प्रकाराने अवैध दारू विक्रेत्यांविरोधात गावात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले होते. मद्यपी दारूचे सेवन करून घरी गेल्यावर घरातील महिलांशी वाद घालून मारहाणीच्या अनेक घटना घडल्या होत्या. त्यामुळे गावाचे आरोग्य बिघडण्याचे मार्गावर होते. पोलिस विभागास अनेकदा सूचना करूनही काही उपयोग होत नसल्याचे गावकऱ्यांचे निदर्शनास येताच महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष उमेश वालदे, महिला सरपंच दीक्षा मेश्राम, उपसरपंच गीता कठाने, दारूबंदी समिती अध्यक्ष वैशाली कठाने, ग्रामपंचायत सदस्य रवी नागदेवे, संजय उईके, ताराचंद वाघाये, सामाजिक कार्यकर्ता चंद्रशेखर कठाने, मनोज मेश्राम, रागिणी पेंदाम, संगीता साखरे यांचे नेतृत्वात सोमवारी अवैध धंदे बंद करावे. या मागणी करिता गावातून मोर्च्याचे आयोजन करण्यात आले. यास महिलांसह पुरुषांचे देखील प्रचंड प्रमाणात सहकार्य लाभल्याने मोर्चा यशस्वी झाला. यावरून महिलांनी ठरविले तर कोणतीही गोष्ट साध्य करून दाखविल्याशिवाय राहत नाही. असे गराडा येथील उदाहरणावरून दिसून येते. अनुचित घटना घडू नये. या करिता पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला असला तरी अवैध धंद्याविरोधात महिला सरसावल्या पुढे या चर्चांना गराडा व परिसरात उत आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या