Ticker

6/recent/ticker-posts

"त्या" युवकास पोलिस विभागाने पुरस्कार द्यावा

 सामाजिक कार्यकर्ता कैलास गेडाम यांची मागणी 

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :-लाखनी तालुक्यातील पालांदूर पोलिस ठाण्याचे हद्दीतील खूनारी येथे दिवसाढवळ्या घरफोडी करून मुद्देमाल घेऊन पळून जाणाऱ्या अट्टल चोराचा पाठलाग करून पकडले असता चोराने शस्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता न डगमगता मित्रास फोन करून त्याचे साहाय्याने ग्रामपंचायत मध्ये आणले व पोलिसांच्या ताब्यात दिले. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अट्टल घरफोड्यास पकडण्याची साहसी कामगिरी केल्याबद्दल विक्की विनायक निंबार्ते(२४) रा. खूनारी याला पोलिस विभागाकडून पारितोषिक देण्यात यावे. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता कैलास गेडाम यांनी केली आहे. 
                       पालांदूर पोलिस ठाण्याचे हद्दीतील खराशी, पळसगाव, झरप येथे चोरीच्या घटना घडल्या होत्या. चोराला पकडण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक सोनवाने यांनी पोलिस पाटील व नागरिकांना मार्गदर्शक सूचना केल्याने गावकरी सतर्क झाले होते. विक्की निंबार्ते व त्याचे मोठे वडील पांडूरंग निंबार्ते यांचे घरी कोणी हजर नसतांना दिवसाढवळ्या घराचे कुलूप तोडून आलमारीत ठेवलेले ५ ग्रॅम सोन्याचे दागिने किंमत २० हजार रुपयाचा मुद्देमाल चोरून अनोळखी इसम अंगणातून पळताना दिसल्याने विक्की ने त्याचा पाठलाग करून गाठले. आपण पकडले गेल्याचे दिसताच चोराने त्याचेकडील हत्याराने हल्ल्याचा प्रयत्न केला. पण विक्की निंबार्ते याने त्यास भिक न घालता मित्रास संपर्क करून बोलावले. मित्राचे साहाय्याने अट्टल घरफोड्यास ग्रामपंचायतीमध्ये नेऊन पोलिसांना सूचना केली. पोलिस आल्यानंतर या अट्टल चोरास पोलिसांचे स्वाधीन केले. या अट्टल चोराचे नाव प्रवीण अशोक डेकाटे(३०) रा. मोहाडी, हल्ली मुक्काम नवेगाव(बांध), जिल्हा गोंदिया असे आहे. विक्की निंबार्ते याने दाखविलेल्या साहसाबाबद पोलिस विभागाने त्याचा सत्कार करून त्याला पारितोषिक देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ता कैलास गेडाम यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या