Ticker

6/recent/ticker-posts

धनदाई महाविद्यालयात जेष्ठ नागरिक आरोग्य तपासणी शिबिर संपन्न



पंकज पाटील चित्रा न्युज

जळगाव :- अमळनेर  येथील धनदाई कला व विज्ञान महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 'जेष्ठ नागरिक आरोग्य तपासणी शिबीर' संपन्न झाले. या शिबिराचे उदघाटक म्हणून विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा. डॉ. संदिप नेरकर हे तर प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री हॉस्पिटलचे डॉ. विक्रांत पाटील, डॉ. मयुरी पाटील, डॉ. प्रियंका पाटील, माजी कुलगुरू शिवाजीराव पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लिलाधर पाटील, संचालिका प्रमिलाताई पाटील, सूर्यवंशी लॅबचे किशोर सूर्यवंशी, ऐस. एम. पाटील, बन्सीलाल भागवत हे तर अध्यक्ष म्हणून धनदाई माता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा. डी.डी. पाटील हे उपस्थित होते.महाविद्यालयाच्या यशवंत सभागृहात आयोजित या शिबिराचे प्रास्ताविक करतांना प्राचार्य डॉ. लिलाधर पाटील यांनी जेष्ठ नागरिकांसाठी कोरोना पूर्व व कोरोना नंतरच्या काळात महाविद्यालयाने आयोजित केलेल्या विविध उप्रक्रमांची माहिती दिली. उदघाटन प्रसंगी सिनेट सदस्य डॉ. नेरकर यांनी विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागातर्फे आयोजित विविध समाजोपयोगी उपक्रमांची माहिती देऊन धनदाई महाविद्यालयाने नेहमीच जेष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रम राबविल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. या प्रसंगी डॉ. विक्रांत पाटील व डॉ. मयुरी पाटील तसेच डॉ. प्रियंका पाटील यांनी जेष्ठ नागरिकांना आरोग्य विषयक मार्गदर्शन केले. यानंतर उपस्थित जेष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.यात त्यांची ब्लड शुगर, ब्लड प्रेशर व इतर तपासण्या करण्यात येऊन त्यांना वैद्यकीय सल्ला देण्यात आला. या आरोग्य तपासणी शिबिरासाठी सुमारे ८० जेष्ठ नागरिक उपस्थित होते. महाविद्यालयातर्फे शिबीर समन्वयक डॉ. भगवान भालेराव यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. किशोर पाटील यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. तर शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉ. प्रशांत पाटील, डॉ. प्रविण पवार, राजेंद्र पाटील, कैलास आहिरे, विष्णू शेट्ये, दगडू पाटील, विनोद केदार, डॉ. संगीता चंद्राकर, प्रा. मीनाक्षी इंगोले, प्रा. मेघना भावसार, प्रा. सागर सैंदाणे, प्रा. जितेंद्र पवार या सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
[9/13, 3:56 PM] सोनू संजीव क्षेत्रे ठाणे: अंबरनाथ शहरात गॅस गळती ! संपुर्ण परीसरात भीतीचे वातावरण 
सखोल चौकशी करून कारवाईची केली मागणी..!

सोनू संजीव क्षेत्रे 

अंबरनाथ: मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील सरकारच्या उदासीनतेवर युवासेना चा इशारा,  अंबरनाथ शहरातली सदर गॅस गळती विषारी असती तर संभाव्य भोपाळ मध्ये घडलेल्या दुर्घटने सारख्या आपत्तीची पुनर्वृति आज अंबरनाथ शहराची झाली असती... राज प्रकाश महाडिक ( अंबरनाथ विधानसभा युवासेना अधिकारी )


दि : १२/०९/२४,अंबरनाथ:  भोपाळ वायू दुर्घटनेची थरारक आठवण करून देताना, मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील, मोरीवली(अंबरनाथ) एम. आय. डी. सी. परिसरात  वायू गळतीची घटना घडली आहे, ज्यामुळे अंबरनाथ शहरातील लाखो लोकांचे जीव धोक्यात आले आहेत...!
राज प्रकाश महाडिक, अंबरनाथ विधानसभा युवासेना अधिकारी-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांनी या घटनेचा त्रीव निषेध करत तात्काळ कारवाई न केल्यास येणाऱ्या आपत्तीचा इशारा दिला आहे.

"ही केवळ कंपनीतील वायु गळती चा सामान्य प्रकरण नाही,  जर तो प्राणघातक वायू असता, तर आपण भोपाळसारखी शोकांतिका पाहत असतो! " असे राज प्रकाश महाडिक ( अंबरनाथ विधानसभा युवासेना अधिकारी ) यांनी म्हटले आहे.

राज प्रकाश महाडिक यांचे सरकार तथा एमपीसीबी कडील प्रमुख मागण्या खालील प्रमाने
- अंबरनाथ परिसरातील सर्व धोकादायक कंपन्या तात्काळ बंद करणे - सर्व घटनांचा सखोल तपास करणे आणि निर्धारित कालमर्यादेत अहवाल सादर करणे - सर्व कंपन्यांकडून एमपीसीबीचे नियम आणि नियमांचे पालन केल्याची पडताळणी करणे आणि कोणतेही उल्लंघन आढळल्यास कायदेशीर कारवाई करणे - एमपीसीबीचे नियम आणि नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी अंबरनाथ शहरातील सर्व रासायनिक कंपन्यांचे सर्वसमावेशक लेखापरीक्षण - भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा उपाययोजना आणि प्रोटोकॉलची अंमलबजावणी -  बाधित नागरिकांना आवश्यक सहाय्य आणि संसाधने - सर्व रासायनिक अती-धोकादायक कंपन्यांचे अंबरनाथ एमआयडीसी मधून स्थलांतर करणे.

जर सरकारने या गंभीर मुद्द्यावर कारवाई केली नाही, तर जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी युवा सेना-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रस्त्यावर उतरेल असा इशारा सरकारला देण्यात आला..!!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या