Ticker

6/recent/ticker-posts

महानगरपालिका कर वसुलीसाठी ॲक्शन मोडवर क्षेत्रिय कार्यालय इतवारा अंतर्गत ४ नळ खंडीत

विजय चौडेकर नांदेड जिल्हा प्रतिनिधी चित्रा न्यूज,,,

नांदेड  :- महानगरपालिकेच्या थकीत कराचा भरणा करण्यासाठी नागरिक टाळाटाळ करीत असल्याने महापालिका आता ॲक्शन मोडवर आली असुन *मनपाआयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे* यांच्या आदेशाने  अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त (कर) अजितपालसिंग संधु यांच्या नियंञणाखाली कर वसुलीसाठी पथकांची नियुक्ती करण्यात आली असुन प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयास जप्ती व वसुलीसाठी उद्दीष्ठ दिलेले आहे.
   
 दि. २३ सप्टेंबर २०२४ रोजी  क्षेत्रिय कार्यालय क्र.५ इतवारा अंतर्गत मालमत्ता धारक म.ईस्माईल शे.मेहताब या मालमत्ता धारकांकडुन करापोटी रक्कम रु.१,१२,४९१/-एवढी रक्कम येणे शिल्लक होती व मालमत्ता धारक पाशु फकीरसाब या मालमत्ता धारकाकडे करापोटी रक्कम रु.९८,४७३/- व तसेच मालमत्ता धारक करिमसाब नजीर अहेमद या मालमत्ता धारकाकडे करापोटी रक्कम रु.५४,७३२/- आणि मालमत्ता धारक फकीरसाब सरवर साब या मालमत्ता धारकांकडे करापोटी रक्कम रु,१,०६,२७८/-एवढी रक्कम येणे शिल्लक असल्याकारणाने सदरील कराची रक्कम भरण्यासाठी असमर्थता दर्शविल्यामुळे संबंधित मालमत्ता धारकांचे नळ खंडीत करण्यात आले आहेत. सदरील कार्यवाही क्षेत्रिय अधिकारी रावण सोनसळे, जी.जी.तोटावार, कर निरीक्षक,वसुली लिपीक व वसुली पथकातील कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे कार्यवाही पार पाडली आहे.

तसेच शहरातील नागरिकांनी महापालिकेच्या स्थगित कराचा भरणा करावा या उद्देशाने महापालिकेने राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये कर भरणाऱ्या नागरिकास शास्तीवरील रक़्क़मेत 80 टक्के सूट देण्याचे आदेश मनपा आयुक्तांनी निर्गमित केले असुन याचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहन महापालिका प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या