Ticker

6/recent/ticker-posts

त्या वृद्ध दाम्पत्यास घरकुलाचा लाभ द्यावा


• सामाजिक कार्यकर्ता कैलास गेडाम यांची मागणी 

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :-लाखनी तालुक्यातील निलागोंदी आणि परिसरात २२ सप्टेंबर ला रात्रीचे सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने सुरुवात केल्याने वयोवृद्ध शेतकरी केवळराम भिकाराम वंजारी(७५) रा. निलागोंडी यांचे राहते घर कोसळल्याने अधीवासाची समस्या निर्माण झाली असल्यामुळे त्या वृद्ध दाम्पत्यास शासनाने घरकुल योजनेचे लाभ द्यावा. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता कैलास गेडाम यांनी केली आहे.  
                      वयोवृद्ध शेतकरी केवळराम वंजारी हे पुरातन मातीचे घरात वास्तव्यास होते. शनिवारी(ता. २१) रोजी रात्री कुटुंबीयांसह जेवण करून झोपी गेले असता रात्रीचे सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात पावसाचे आगमन झाल्याने त्यांचे राहते घर कोसळले. त्यात जीवनावश्यक वस्तू व साहित्याचे नुकसान झाले तसेच तेही किरकोळ जखमी झाले होते. त्याच प्रमाणे काही कोंबड्याही मृत्युमुखी पडल्या होत्या. या बाबद आजूबाजूला राहणाऱ्यांना माहिती होताच आरडा ओरड केल्याने गावकरी मदतीस धावले व त्यांना मलब्याबाहेर काढले. असे सामाजिक कार्यकर्ता कैलास गेडाम यांचे म्हणणे आहे. 
                   घटनेची माहिती तलाठी निशांत नेवारे यांना देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी जाऊन नुकसानग्रस्त घराचा पंचनामा करून ५० हजार रुपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला असून तसा अहवाल तहसीलदार लाखनी यांचेकडे पाठविला. या वृद्ध दाम्पत्यास वास्तव्याची अडचण निर्माण झाल्याने त्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता कैलास गेडाम यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या