विठ्ठल पाटील लातूर
लातूर :-अन्य लाकडाच्या आड सागवान या जातीच्या लाकडांची अवैध वाहतूक व विक्री तसेच कटाई दिनदहाडे होत आहे.तसेच विनापरवाना आरा मशीन गत कांही वर्षापासुन चालू आहे.तरी ही या गोरख धंद्यावर आजवर कुणीच कारवाई केली नाही.यामुळे हे धंदे करणा-यांना आर्शीवाद कुणाचा ? तालुका फाॅरेस्ट आफीसचा T.F.O. का,D.F.O.जिल्हा फाॅरेस्ट आफीसचा असा प्रश्न हाळी-हंडरगुळीकरांमधून विचारला जात आहे .
हाळी-हंडरगुळी {ता.उदगीर} येथे असलेल्या आरा मशीन पैकी एकास संबंधित खात्याचा कोणताही परवाना नाही.तरीही महाराज बिनधास्तपणे लाकडी अड्डा,आरा मशीन दिनदहाडे चालवतो आहे.तसेच हाळीतील एका परवानाधारक लाकडी अड्ड्या मध्ये अवैधरित्या तोडलेल्या झाडांची सरे आमपणे आवक-जावक होते.ते पण लाकडांना ताडपञी आड झाकुन अड्ड्यात आणतात.तेंव्हा यामध्ये सागवान जातीचे लाकडं असल्याचा संशय आहे.आणी हे सर्व गोलमाल काळे धंदे खुलेआमपणे होताना व विनापरवाना आरा मशीन व अड्डा चालताना सामान्य जनतेला दिसतात. माञ संबंधित अधिका-याला दिसत नाहीत.याचेच नवल वाटते.कांही महिण्यापुर्वी तक्रारीवरुन संबंधित विभागाने अवैध चालणारी आरा मशीन हटविण्यासाठी लातुरच्या एस.पी.कार्यालयाकडे पोलीस प्रोटेक्शन मागीतले होते.व वाढवणा पोलीस विनापरवाना चालू असलेल्या त्या आरा मशीनची व मालकाची चौकशी केल्याचे समजते. पण नंतर माशी कुठे शिंकली आणी मागणी केलेल्या पोलीस प्रोटेक्शनचे पुढे काय झाले.हे फक्त संबंधित टी.एफ. ओ . आणी डी.एफ.ओ . यांनाच माहित.कारण ती आरा मशीन व अड्डा जैसे थे धुमधडाक्यात चालतोच आहे.कारवाई करण्यासाठी तालुका व जिल्हा फाॅरेस्ट अधिकारी घाबरत असल्यानेच हाळी-हंडरगुळीत अवैध व बेसुमार झाडांची विशेष करुन साग वान झाडांची कत्तल होत असुन,या भागात सागवान व अन्य झाडांची कत्तल व विक्री करणा-या तस्करांच्या टोळ्या शिवारात हिंडतात. व या टोळ्यांना या भागातील एक माजी लोकप्रतिनिधी व एक मास्तर हे बाप - ल्योक सं.अधिका-यांना हाताशी धरुन तस्करांना पाठबळ देत आहेत ! म्हणुनच झाडांची बेसुमार कत्तल होत आहे.अशी कुजबूज हाळी, वडगाव, शेळगाव,सुकणी,टाकळगावपरिसरातील जनतेतून सर्रासपणे ऐकू येत आहे ..
**************************
*एक्सपायरी डेट संपलेले ट्रक व*
*ट्रॅक्टर करतात झाडांची वाहतूक*
***************************
हाळी-हंडरगुळीत असलेल्या आरा मशीन मध्ये दुरदुरवरुन विक्रीसाठी सागवानासह अन्य जातीचे लाकडं मोठ्याप्रमाणात विक्रीसाठी येतात. व यासाठी ट्रक व ट्रॅक्टरचा वापर होतोय आणी यातील बहूतांश ट्रक,ट्रॅक्टर हे नंबर नसलेले तसेच त्यांची डेट बाद झालेली.अशा एक्सपायरी वाहनां - मधून राञंदिवस लाकडांची बेसुमार आवक-जावक होत असते.यातील कांही वाहनांतील लाकडांची झाकून वाहतूक केली जात असल्याने अन्य लाकडांच्या आड चंदन व सागवान या जातीचे लाकडं असू शकतात. तरीही यावर आजवर कुणी पण कारवाई केली नाही.म्हणुन एक्स - पायरी डेट संपलेली वाहने आणी अवैध लाकडी अड्डा व आरा मशीन हाळीहंडरगुळीत धुमधडाक्यात चालू आहेत.व या धंदेवाल्यांना आर्शीवाद कुणाचा?टी.एफ.ओ.चा. का,डी.एफ. ओ.चा असा प्रश्न विचारला जातोय..


0 टिप्पण्या