विठ्ठल पाटील लातूर
लातूर :-बस मधून ये-जा करणा-या प्रवाशांना कोणती समस्या वा अडचण वाटत असल्यास त्या प्रवाशांना थेट आगार प्रमुखाशी संपर्क करता यावा , म्हणुन बस चालकाच्या पाठीमागच्या जागेत संबंधित आगार प्रमुख,स्थानकप्रमुख, कार्यशाळा प्रमुख यांचा पत्ता व फोन नंबर लिहिण्यात येणार आहे.अशी घोषणा महामंडळातर्फे करण्यात आली आहे.व तशा बातम्या विविध दैनिकातुन प्रसिध्द केल्या आहेत.
माञ,उदगीर ते अहमदपुर मार्गावर धावणा-या वरील दोनही आगाराच्या बस मध्ये ना कोणत्या अधिका-याचा पत्ता लिहिलाय,ना नंबर .! यामुळे जर कुणाला तक्रार करायची असेल तर ती कुठे करावी ? असा प्रश्न प्रवाशी जनतेतून विचारला जात आहे.तसेच याची अद्याप अंमलबजावणी झाली नसल्याने या योजनेचा बोजवारा उडाल्याची चर्चा हंडरगुळी ते उदगीर बस प्रवासादरम्यान प्रवाशांत आहे .
एसटीने प्रवास करणा-यांना प्रवासात कांही छोटी-मोठी अडचण आल्यास प्रवाशांना अडचणीबद्दल थेट त्या-त्या आगार प्रमुखांकडे तक्रार करता येऊ शकेल.तद्नंतर त्या तक्रारींचे तत्काळ निवारण होईल.अशा प्रकारची यंञना सुविधा महामंडळाकडून उप्लब्ध केली आहे.बस ड्रायव्हरच्या मागच्या बाजूस संबंधित बस आगार प्रमुख , स्थानक प्रमुख व कार्यशाळा प्रमुख यांचे फोन नंबर असतील.अशी नवी घोषणा महामंडळातर्फे करुन अनेक दिवस झाले.तरी उदगीर,अहमदपुर आगाराच्या बस मधील चालकाच्या पाठीमागच्या जागेत अधिका-याच्या फोन नंबर ऐवजी जाहिरातीचे बॅनर डकविलेले दिसते.म्हणुन महामंडळा द्वारा घोषित केलेल्या या चांगल्या योजनेचे संबंधितांनी बारा वाजविले.!
जर एखादा चालक अतिवेगामध्ये तसेच फोनवर बोलत बस चालवित आहे. तसेच एखादा कंडक्टर हा प्रवाशांशी उध्दटपणे बोलत आहे, आणि ठराविक ठिकाणी बस उभा केली नाही.यासारख्या असंख्य तक्रारी प्रवाशांमधून केल्या जातात.व या सर्व तक्रारींची शहानिशा करुनच महामंडळाने प्रवासादरम्यान तक्रार असेलतर करा थेट फोनवर संपर्क ! अशा प्रकारची योजना सुरु केलीआहे माञ तक्रार नेमकी कुठे करावी.हाच प्रश्न अजुनही कायम आहे.कारण उदगीर-अहमदपुर आगारातील कांही ड्रायव्हर अतिवेगात व फोनवर बोलत बस चालवितात.तर कांही कंडक्टर विशेष करुन कांही महिला कंडक्टर या महिला असल्याचा व अंगावर वर्दी असल्याचा गैरफायदा घेत प्रवाशांशी उर्मट भाषा वापरतात.व असे प्रकार सर्रासपणे वरील आगारातील कांही वाहक व चालक महाशयांकडून होत असल्याचे प्रवासादरम्यान दिसतात . म्हणुन महामंडळाने तत्काळ नंबर लिहावे.अशी प्रवाशांची मागणी आहे.
पुर्वी बहूतांश बसेस मध्ये नंबर्स होते. पण कालांतराने त्या नंबरच्या जागेत जाहिरातीचे फोटो दिसू लागले . त्यामुळे प्रवाशांना कांही अडचण वा समस्या जाणवल्यास त्यासाठी दाद कुठे मागावी ? हा एक मोठा गहन प्रश्न होता.आणी म्हणुन तसेच कांही तज्ञांसह प्रवाशांच्या मागणीची एसटी महामंडळानी दखल घेतली.आणी आता प्रत्येक बस चालकांच्या पाठी मागच्या पञावर त्या-त्या आगार प्रमुखाचा व अन्य अधिका-यांचा फोन नंबर स्पष्ट पणे लिहिण्यात येणार आहे.व यावर फोन करुन अतिवेगात व फोनवर बोलत बस चालविणा-या चालकांची तसेच उर्मट भाषा वापरणा-या वाहक मंडळींची तसेच गळक्या व खटारा बसेसची तक्रार प्रवाशांनी करावी.या करीता ही यंञणा एसटी प्रशासनाने उभी केली आहे.माञ उदगीर तसेच अहमदपुर आगाराच्या बसेस मध्ये अशी कोणतीच यंञणा वा नंबर दिसत नाही.यामुळे रोज खंडीभर समस्या व तक्रार असुनही ती कुठे मांडायची ? असा सवाल एसटी च्या प्रशासनाला हाळी हंडरगुळी आणी परिसरातील ञस्त प्रवाशांतुन विचारला जात आहे .


0 टिप्पण्या