Ticker

6/recent/ticker-posts

वाचनामुळे विद्यार्थ्यांची अनुभव कक्षा विस्तृत होते - प्रा. शेषराव माने


 लिंगोजी कदम जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी नांदेड  

नांदेड :-बळीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञापन महाविद्यालय किनवट येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने भारताचे अकरावे राष्ट्रपती डॉ ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरी करण्यात आली. प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ. एस.के.बेंबरेकर हे होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. शेषराव माने यांनी केले. ते बोलताना म्हणाले की दुर्दम्य इच्छाशक्ती असणाऱ्या आणि ठाम आत्मविश्वास असणाऱ्या डॉ. कलाम यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू होते. नितळ मन आणि दिलदार स्वभाव हे त्यांचे वैशिष्ट्य होते. देशाच्या युवा पिढीला त्यांनी आपल्या विचारांनी आणि कर्तृत्वाने भारावून टाकले होते. भारत नक्कीच महासत्ता बनेल, हा विश्वास त्यांनी प्रत्येक भारतीयाच्या मनात निर्माण केला होता. त्यांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांमधून येणाऱ्या काळात भारत कसा महासत्ता म्हणून पुढे येणार आहे, भारताची खरी शक्ती ही युवाशक्ती कशी असणार आहे हे त्यांनी सांगितले आहे. डॉ. कलाम यांचे लेखन स्फूर्तीदायी आहे. डॉ. कलाम नेहमी म्हणत असत की, एक चांगले पुस्तक शंभर मित्रांप्रमाणे असते. त्यामुळे  विद्यार्थ्यांनी डॉ.कलाम यांची पुस्तके वाचावीत, त्याचबरोबर इतर साहित्याचेही जास्तीत जास्त वाचन करावे त्यामुळे अनुभव कक्षा विस्तृत होतात आसे ते म्हणाले.
डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम  यांच्या प्रतिमेला महिविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.के.बेंबरेकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 
याप्रसंगी उपप्राचार्य  डॉ पंजाब शेरे, पर्यवेक्षक  प्रा.विजय खुपसे,डॉ. आनंद भालेराव, सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ जी.बी.लांब,प्रा. अनिल पाटील, ग्रंथालय विभाग प्रमुख मंदाकिनी राठोड, डॉ .प्रज्ञा घोडवाडीकर,डॉ. जी. एस.वानखेडे प्रा. आम्रपाली हटकर रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डी टी चाटे, प्रा. पुरुषोत्तम येरडलावार, रासेयो महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. शुभांगी दिवे, डॉ  स्वाती कुरमे, डॉ.विजया खामनकर,दीपक खंदारे, काशिनाथ पिंपरे, गौरव पवार ,जान्वी सराफ, असबा शेख, विनायक पोंतकटवार, सुधांशू लिंगमपेल्लीवार बहूसंख्येने रासेयो स्वयंसेवक, स्वयंसेविका  उपस्थित होते. उपस्थितांचे आभार प्रा.डाॅ.शुभांगी दिवे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या