चित्रा न्युज ब्युरो
भंडारा : डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रणित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांना निवेदन देण्यात आले.भंडारा पोलीस विभागाच्यावतीने जादूटोणाविरोधी कायद्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा समाजात असलेली अंधश्रद्धा दूर व्हावी.यासाठी जिल्ह्यातील काही पोलीस स्टेशन अधिकाऱ्यांनी जनजागृती कार्यक्रम घेतल्यामुळे बऱ्याच घटनांना प्रतिबंध घालता आला. जिल्ह्यात अस्तित्वहीन जादूटोणा करणी केल्याच्या आरोपावरून निष्पाप लोकांचे जीव जाऊ नये यासाठी जादूटोणाविरोधी कायद्याचा प्रचार व प्रसार आणि अंमलबजावणी कार्यक्रम घेण्याचे आदेश भंडारा जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना आदेश द्यावे अशी मागणी बुवाबाजी विभागाचे राज्य सहकार्यवाह विष्णुदास लोणारे, उपाध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे, सिद्धार्थ लांजेवार यांनी निवेदनातून केली आहे.


0 टिप्पण्या