पंकज पाटील चित्रा न्युज
जळगाव :- विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थी सदस्यांचा शपथ ग्रहण समारोह मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अॕड. संदीप सुरेश पाटील, डॉ. हेमंत पाटील , इन्स्पेक्टर कावेरी कमलाकर, शाळा समन्वयक प्राध्यापक डॉ. डी. एस. पाटील आणि प्रा.अशोक साळुंखे तसेच मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती आणि पालक वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. या प्रसंगी इयत्ता आठवीच्या विद्यार्थीनींनी स्वागत गीत सादर केले. त्यासाठी त्यांना शाळेतील संगीत शिक्षिका अश्विनी ढबू यांचे मार्गदर्शन लाभले. इयत्ता आठवीच्या विद्यार्थीनींनी आकर्षक नृत्य देखील सादर केले. त्यासाठी त्यांना शाळेच्या नृत्य शिक्षिका दिपाली पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. मुलांचा प्रमुख विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून इयत्ता दहावीचा विद्यार्थी अभिनव अशोक साळुंखे आणि मुलींची प्रमुख विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून शार्ली रामकृष्ण महाजन यांनी शपथ ग्रहण केली.मुलांचा उपप्रमुख विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून इयत्ता दहावीचा विद्यार्थी नाविन्य सुनील चौधरीआणि मुलींची उपप्रमुख विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून हिरल चेतन ठक्कर यांनी शपथ ग्रहण केली. विविध विभागातील विद्यार्थी प्रतिनिधींनी देखील शपथ ग्रहण केली. यात खेळ विभाग प्रमुख म्हणून पियुष पाटील, राणा पाटील, गार्गी चौधरी आणि भार्गवी पाटील , सांस्कृतिक विभाग प्रमुख म्हणून आयुष जैन, गितेश कोळी, लक्ष्मी महाजन, केनिषा सचदेव, शिस्त विभाग प्रमुख म्हणून यश महाजन, हर्षित पालीवाल, श्रावणी शिंदे अनोषा सय्यद, रेड हाऊस लीडर सर्वेश सैंदाणे क्रिष्णाली शिरसाट, यलो हाऊस लीडर श्लोक पाटील, यज्ञेश्वरी पाटील, ग्रीन हाऊस लीडर सिद्धांत पाटील, प्राची धनगर, ब्लू हाऊस लीडर दिवेश खाचणे, भूमी देवरे यांनी देखील शपथ ग्रहण केली. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती यांनी मांडले आणि सर्व विद्यार्थी प्रमुखांना शपथ दिली.
कावेरी कमलाकर आणि प्राध्यापक डॉ. डी. एस. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थी प्रतिनिधी अभिनव साळुंखे आणि शार्ली महाजन यांनी देखील मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी विविध क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा देखील सत्कार करण्यात आला. कुणाल संदीप वाडे यास खेलो इंडिया अंतर्गत धावण्याच्या स्पर्धेत जिल्हास्तरावर यश संपादन केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. अंश जाधव याला जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन मध्ये निवड झाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. दिव्यतेज अतुल पाटील याने राष्ट्रीय स्तरावर पिकल बॉल स्पर्धेत विशेष यश संपादन केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. भालाफेक या स्पर्धेमध्ये जिल्हास्तरावरील स्पर्धेसाठी सारा अजित पाटील या विद्यार्थिनीची तर थाली फेक या स्पर्धेमध्ये दुर्वाक्षी महाजन या विद्यार्थिनीची निवड झाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. हर्षित कैलास पालीवाल याची 17 वर्षाखालील मुलांच्या बुद्धिबळ स्पर्धेत जिल्हास्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. 14 वर्षे वयोगटमध्ये कॅरमच्या जिल्हास्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल कृतिका शर्मा या विद्यार्थिनीस आणि निशांत पाटील, पार्थ चौधरी व अंश जाधव यांना सन्मानित करण्यात आले. आर्या सोनवणे, अनुष्का पाटील, भार्गवी पाटील, अनुष्का सुर्वे, माधुरी पाटील या विद्यार्थिनींची आणि दिवेश खाचणे, हार्दिक अग्रवाल, पियुष पाटील, हर्षद पालीवाल व दिव्यतेज पाटील यांना जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. हिरल ठक्कर, श्रावणी शिंदे, संस्कृती शिंदे आणि भार्गवी पाटील या विद्यार्थ्यीनींची जिल्हास्तरावर बुद्धिबळ या खेळासाठी निवड झाल्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले. क्रिकेटच्या शालेय संघातील विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी सन्मानित करण्यात आले. या संघात आदित्य बेहरे, चंदन महाले, शतायू सोनवणे, हर्षल पाटील, हार्दिक चौधरी, कौस्तुभ चौधरी, दिवेश खाचणे, पारस जैन, पियुष पाटील, यश महाजन, राज सोनवणे, श्लोक पाटील, सर्वेश सैंदाणे, सिद्धम जैन, हितेश पाटील आणि हिमांशू बोरसे या विद्यार्थ्यांचा समावेश होता. शाळेतील क्रीडा शिक्षक भूषण गुजर यांना देखील याप्रसंगी सन्मानित करण्यात आले. प्रा. डॉ. डी. एस. पाटील यांना पीएचडी मिळाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले.
रंगोत्सव सेलिब्रेशने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील कला स्पर्धांमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना देखील सन्मानित करण्यात आले. यामध्ये पूर्वा देशमुख, सोनाक्षी गेही, तकदीश खान, आयुष पाटील, मंदार कुलकर्णी, अनुष्का सुर्वे, तनझीम पटेल, गोपेश अग्रवाल, वृक्षाली सोनवणे आणि शिवराज देशमुख या विद्यार्थ्यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक दीप्ती पाटील, विशाल मराठे आणि सलोनी अग्रवाल यांनी केले. आभार प्रदर्शन शाळेतील शिक्षिका हर्षा पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.


0 टिप्पण्या