Ticker

6/recent/ticker-posts

लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे परभणी जिल्हा सचिव प्रमोद अशोकराव अंभोरे यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्यांवर पत्रकार संरक्षण कायदा व अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी

चित्रा न्युज ब्युरो
परभणी :-लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे परभणी जिल्हा सचिव तथा समाजहित न्युज चॅनलचे संस्थापक संपादक प्रमोद अशोकराव अंभोरे यांच्यावर दिनांक 4 ऑक्टोंबर रोजी परभणी शहरातील डॉ. आंबेडकर नगर आय. टी.आय. कॉर्नर जिंतूर रोड येथे झालेल्या प्राणघातक हल्याच्या निषेधार्थ लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ जिल्हा शाखा परभणी च्या वतीने आज दिनांक 5 ऑक्टोंबर रोजी जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांना निषेध निवेदन सादर केले असून हल्ला करणाऱ्यांवर तात्काळ कार्यवाही करून अटक करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. मागण्या मंजूर न झाल्यास लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीने पत्रकारांच्या हितासाठी व त्यांच्या संरक्षणार्थ संपूर्ण भारत भर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.  सविस्तर वृत्तांत असे की एम.एस.सी.बी चे काही कर्मचारी हे रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वस्तीगृहाच्या मालकीच्या जागेत सर्वे करत होते तेव्हा पत्रकार प्रमोद अंभोरे यांनी तुम्ही कशाची पाहणी करत आहात या संदर्भात विचारपूस केली तेव्हा त्यांनी उत्तर दिले की विद्युत मीटर देण्यासाठी अर्ज करण्यात आला होता त्या संदर्भात चौकशी करण्यासाठी आलो असल्याचे त्यांनी सांगितले तेव्हा पत्रकार प्रमोद अंभोरे यांनी अनधिकृत बेकायदेशीर विद्युत मीटर घेण्याच्या संदर्भात आक्षेप घेतल्याचा राग धरून 1)शेख मोहम्मद सादेख मोहम्मद इब्राहिम, 2) शेख नसरीन शेख सादेक, 3)शेख इलीयास उर्फ बबलू शेख सादेक, 4) शेख अकबर शेख सादेक 5) दलाल यांनी संगनमत करून "तुझे क्या करना है तेरी पत्रकारिता हमे मत सिखा महारडे, हमारा कोई भी कुछ भी तेढा नही कर सकता, तू बीच मे मत पड नही तो तुझे और तेरे सारे परिवार को खतम कर डालेंगे." असे म्हणत व जातीवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याच्या उद्देशाने लाता बुक्या व लाकडाने पत्रकार प्रमोद अंभोरे यांना बेदम मारहाण करण्यात आली. प्रमोद अशोकराव अंभोरे यांच्यावर सध्या परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचार सुरू आहे. त्यांना डाव्या पायाला, पाठीला, खांद्याला मुक्का मार लागलेले आहे. त्यांच्यावर झालेल्या या मारहाणीचा लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत असून संबंधितांवर पत्रकार संरक्षण कायदा व अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करून कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

पत्रकार हा आपल्या जीवाची पर्वा न करता असे बेकायदेशीर व अनधिकृत होत असलेले कामे रोखण्यासाठी आपल्या माध्यमाद्वारे प्रसिद्ध करून शासनास व प्रशासनास दाखवून देण्याचे काम करत असते. तसेच पत्रकारिता लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून समाजाचा आरसा म्हणून काम करत असतो. पत्रकारांवर वारंवार होत असल्याचा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ वारंवार निषेध निवेदन देऊन शासनास व प्रशासनास विनंती करत आहेत. परंतु आपले शासन व प्रशासन कुठल्याच प्रकारची गंभीर दखल घेत नाही. पत्रकार प्रमोद अंभोरे यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्यांवर तात्काळ कार्यवाही करून अटक न झाल्यास लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीने पत्रकारांच्या हितासाठी व त्यांच्या संरक्षणार्थ संपूर्ण भारत भर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला. या वेळी राज्य संघटक तथा प्रसिध्दी प्रमुख भगीरथजी बद्दर, जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर, शेख महेबुब, बाळासाहेब घिके, सय्यद जमील, विशाल गायकवाड, अमर गालफाडे, राहुल वहीवाळ, राहुल धबाले, शेख सरफराज, शेख अझहर समवेत पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या