Ticker

6/recent/ticker-posts

चंद्रकांत उर्फ राजू भैय्या नवघरे यांचा वसमत विधानसभा लढती मध्ये २९५८८ मतधिक्यानी विजयी


श्रीकांत बाराहते, जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण हिंगोली 

 हिंगोली / वसमत विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे उमेदवार चंद्रकांत उर्फ राजू नवघरे यांनी त्यांच्या राजकीय विजयाची परंपरा कायम ठेवत २९५८८ एवढ्या मताधिक्याने जिंकली आहे. हा विजय वसमत विधानसभेतील सलग दुसरा विजय असल्यामुळे त्यांच्यासाठी ऐतिहासिक ठरला आहे.
  निवडणुकीच्या प्रचाराच्या कार्यकाळात ही निवडणूक खूप अटीतटीची होणार अशीच परिस्थिती पाहायला मिळत होती त्यामुळे वसमत विधानसभा कोण जिंकणार याची उत्सुकता विधानसभा क्षेत्रातील सर्व जनतेला लागली होती. परंतु ति उत्सुकता मतमोजणीच्या काही फेऱ्यांमध्येच विरून गेल्याची पाहायला मिळाली कारण सकाळपासून मतमोजणीस सुरुवात झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार चंद्रकांत उर्फ राजूभैया नवघरे यांनी पहिल्याच फेरीमध्ये ३४८१ मतांचे मतधिख्य घेऊन आघाडी घेतली आणि ही आघाडी सोळाव्या फेरीपर्यंत वाढत वाढत जाऊन २७७०१ मताधिक्याची झाली त्यानंतर १७, १८, १९ या तीन फेऱ्यांमध्ये काही प्रमाणात मतधिक्के घटून कमी झाले होते त्यानंतर मग कुठेही न थांबता शेवटच्या म्हणजेच २४ व्या फेरीपर्यंत चंद्रकांत उर्फ राजू नवघरे हे वरचढ राहून २९५८८ मतांची बढत घेऊन विजयी झाले.
 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाचे उमेदवार माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आमदार चंद्रकांत उर्फ राजू नवघरे यांच्यामध्ये काटे की टक्कर पाहायला मिळेल असे वाटत होते परंतु तसे २४ व्या फेरीपर्यंत कुठेही चित्र पाहायला मिळाले नाही पहिल्या फेरी पासून ते शेवटच्या फेरीपर्यंत चंद्रकांत उर्फ राजु नवघरे हे वरचढ असल्याचे पाहायला मिळाले आणि शेवटी २९५८८ मताधिक्य घेऊन विजयी झाले आहेत. 
 मतमोजणीच्या अंतिम फेरीमध्ये १. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार  चंद्रकांत उर्फ राजू नवघरे यांना १०७६५५  २. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ७८०६७  ३. जन सुराज्य शक्ती पक्षाचे गुरूपादेश्वर महाराज ३५२१९   ४. वंचित बहुजन आघाडी पक्षाचे प्रितीताई जैस्वाल १४०२७  असे या उमेदवाराने  मतदान घेतले आहे. यामध्ये चंद्रकांत उर्फ राजू भैय्या नवघरे यांनी २९५८८ एवढ्या मतांचे मताधिक्य घेऊन विजयी झाले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या