पंकज पाटील विभागिय संपादक नाशिक विभाग
अमळनेर :- स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल अमळनेर येथे Techno Ved Art Mela 2.0 चे अतिशय सुंदर आयोजन करण्यात आले होते. सदर प्रसंगी माझ्यासह विविध विषयांचे परीक्षणासाठी शिक्षण / वैद्यकिय / तंत्रज्ञान व कला क्षेत्रातील मान्यवरांना परीक्षक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते . विदयार्थांच्या सुप्त कला गुणांना वाव देण्याकामी व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेने गणित , विज्ञान , आयुर्वेद , तंत्रज्ञान , कला , संस्कृत सह विविध भाषा , ऐतिहासिक - भौगोलिक प्रात्यक्षिकासह अध्यात्माचा अंतर्भाव या मेळ्यात करण्यात आला होता . सदर प्रसंगी शाळेचे अध्यक्ष श्री निरज अग्रवाल , सौ अग्रवाल , संचालक श्री डी डी पाटील सर श्री एस डी देशमुख , श्री डॉ. शरद बाविस्कर , श्री सुनिल पाटील सर , श्री निरंजन पेंढारे सर , श्री कोल्हे सर , सौ. नवसारीकर मॅडम , शाळेचे प्रिंसीपल श्री विनोद अमृतकार सर व इतर मान्यवरांची उपस्थिती होती .


0 टिप्पण्या