Ticker

6/recent/ticker-posts

अबब… निसर्गाचा चमत्कार बिना पंपाने बोरवेल बाहेर पाणी !

• निलागोंदी शेतशिवारातील घटना

चित्रा न्युज ब्युटी
भंडारा :- निसर्गाने किमया केली की, असाध्याचे साध्य होते  हि पारंपारिक म्हण प्राचीन काळापासून बोलल्या जाते. त्याच म्हणीचा प्रत्यय निलागोंदी येथील शेतशिवारात आला. चक्क मोटारपंप नसलेल्या कुपनलीकेतून(बोअरवेल) मधून पाणी वर येत असल्याने परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. कृषी विषायात पदविका केलेल्या तरुणाने नोकरीच्या मागे न लागता पारंपारिक शेती बरोबरच नगदी पिक घेण्याचे मनात बाळगून शेतात सिंचनासाठी कुपनलिका(बोअरवेल) खोदली मात्र अपयश पदरी पडले यंदाही ३ बोअरवेल खोदले त्यातील २ यशस्वी झाल्या. त्यात मोटारपंप टाकण्यासाठी गेले असता त्यातून चक्क पाणी येत असल्याने उपस्थित सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. 
            यंदा तालुक्यात सरासरीच्या तुलनेनं कमी पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे परिणामी बहुतांश ठिकाणी दुष्काळामुळे नापिकी झाल्याने शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. तालुक्यात कोणतेच मोठे मध्यम तसेच लघु सिंचन प्रकल्प नसल्याने कमी पावसामुळे सतत नापिकी होत आहे. यावर मात करण्यासाठी  शेतीवर आधारीत व्यवसाय करण्याच्या दृष्टीने गावातील कृषी अभ्यासिका घेतलेले रविकांत सेलोकर या युवा शेतकऱ्याने दरवर्षी बोरवेल खोदकाम केले. पण यश काही आले नाही जिद्द मनाशी बाळगून या वर्षी सुद्धा तीन बोर घेतल्या त्यात  शेतात साधारण दोनशे फूट खोल बोर मारून दोन बोर यशस्वी झाले. रब्बी पिकाबरोबर भाजीपाला पीक घ्यायचा. या उद्देशाने बोरमध्ये सबमर्शिबल पंप टाकायला गेले असता बोरमध्ये असलेल्या केसिंगची वेल्डिंग तोडली असता चक्क बोरवेलमधून पाणी बाहेर निघून वाहत असल्याने निसर्गाचा चमत्कार पाहून ग्रामस्थ देखील आश्चर्यचकित झाले आहेत.
यामुळे ग्रामस्थांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. तालुक्यातील निलागोंदी येथील शेतशिवारातील युवा शेतकरी रविकांत विठ्ठल सेलोकर यांच्या शेती क्षेत्रात तब्बल २०० फूट खोल बोरवेल आहे. मात्र या बोरवेलला दीड इंचचा पाणी लागल असल्याने पंप टाकला नसल्याने तो बंद स्थितीत होता. गेल्या काही दिवसांपासून या बंद स्थितीतील बोरवेल मधून केसिंगला धक्का लागल्याने अचानक पाणी बाहेर येत असल्याने ग्रामस्थांमध्ये या विषयी कुतूहल निर्माण झाले आहे. बिना इलेक्ट्रिक कनेक्शन, इलेक्ट्रिक पंप शिवाय या बोरवेल मधून पाणी बाहेर वाहत आहे. यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीपासूनच कमी-जास्त पाऊस झाला असला तरी भूगर्भातील खडकातील, झिरप्यांची पाणी साठवण्याची क्षमता संपल्याने बोरवेलच्या माध्यमातून पाणी जमिनीवर येत आहे. असा अंदाज बांधला जात असला तरी निसर्गाचा हा चमत्कार पाहण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी होत आहे. तसेच ग्रामस्थांमध्ये कुतूहलाचा विषय झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या