पंकज पाटील विभागिय संपादक नाशिक विभाग
अमळनेर: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणुक आयोगातर्फे महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ टाकरखेडा रोडवरील गोदाम क्रमांक 6 येथे सर्व बीएलओ, सेक्टर ऑफिसर यांची महाबैठक आयोजित करण्यात आली. यावेळी या बैठकीत बीएलओ यांना मतदान केंद्राविषयी आवश्यक मार्गदर्शक सुचना देण्यात आल्या. त्यानंतर प्रत्यक्ष मतदानाचा दिवशी मतदानाची आकडेवारी भरण्याबाबतचे ॲप (लिंक) याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मतदार स्लीप वाटपाबाबत अहवाल सर्व बीएलओ यांच्याकडून घेण्यात आला. या सभेला निवडणूक जनरल निरीक्षक सिंह साहेब, निवडणूक निर्णय अधिकारी प्रांत नितीनकुमार मुंडावरे, तहसीलदार रूपेशकुमार सुराणा, बीडीओ ओमप्रकाश रामावत, नायाबतहसिलदार प्रशांत धमके तसेच सर्व निवडणूक विभाग कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने बीएलओ उपस्थित होते.


0 टिप्पण्या