Ticker

6/recent/ticker-posts

नानाभाऊने बाईक रॅलीने केला प्रचाराचा समारोप


• बाईक रॅली ला लाखनीत उत्स्फूर्त प्रतिसाद

चित्रा न्युज ब्युरो
भंडारा :- महाविकास आघाडी प्रणित भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष तथा साकोली विधानसभा निर्वाचन क्षेत्राचे उमेदवार नाना पटोले यांचेवर राज्यात प्रचाराची जबाबदारी असल्याने त्यांना आपले स्वतःचे मतदार संघात फारसा वेळ देता आला नाही. त्यामुळे प्रचार समाप्तीच्या शेवटचे दिवशी सोमवारी(ता.१८) दुपारी १:०० वाजता आमदार नाना पटोले यांचे नेतृत्वात के.के. लॉन लाखनी येथून बाईक रॅलीस सुरुवात करण्यात आली. या बाईक रॅलीस नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. सायंकाळी ५:०० वाजता हनुमान मंदिर आदर्श नगर येथे प्रचाराचा समारोप करण्यात आला. 
                     साकोली विधानसभा निर्वाचन क्षेत्रात आमदार नाना पटोले उमेदवार असले तरी ते काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष असल्याने राज्यात प्रचाराची जबाबदारी त्यांचेवर असल्याने त्यांचा इतर मतदार संघात अधिक वेळ जात असल्यामुळे साकोली विधानसभेत पटोले कुटुंबीय व कार्यकर्त्यांनी प्रचारास मेहनत घेतली होती. प्रचाराला ३ ते ४ दिवस शिल्लक असताना आमदार नाना पटोले यांची सालेभाटा व पिंडकेपार येथे प्रचार सभा झाली. त्यानंतर रविवार(ता. १७ नोव्हेंबर) रोजी पालांदूर चौरास येथे त्यांचे प्रमुख उपस्थितीत प्रचार सभा झाली. पण लाखनी व साकोली शहराकडे लक्ष द्यायला त्यांना वेळच मिळाला नाही. वेळात वेळ काढून साकोली व लाखनी येथे बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. 
                       के.के. लॉन लाखनी येथून दुपारी १:०० वाजता बाईक रॅलीस सुरुवात करण्यात आली. सेलोटी/फाटा-गुजरी चौक-विठ्ठल रुखमाई मंदिर-बौद्ध विहार-सार्वजनिक हनुमान मंदिर-दीक्षित मिल-तहसील चौक-श्रीराम मंदिर-गराडा रोड-पेट्रोल पंप-केसलवाडा/वाघ फाटा-ग्रामपंचायत मुरमाडी-स्टेट बँक-ग्रामपंचायत सावरी-अनिल निर्वाण-सिंधी लाईन चौक-राज मेडिकल-पाण्याची टाकी-फौजल आकबानी-बाजार समिती-लवकुश निर्वाण-आदर्श नगर, हनुमान मंदिर येथे मतदान संपण्याची वेळ ५ वाजता असल्याने बाईक रॅलीचा समारोप करण्यात आला. बाईक रॅलीत आमदार नाना पटोले यांचेसह प्रदेश कार्यकारिणी सदस्य आकाश कोरे, तालुकाध्यक्ष योगराज झलके, सेवादल जिल्हाध्यक्ष कैलास भगत, शहर अध्यक्ष मोहन निर्वाण, तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष यशवंत खेडीकर, शिवसेना(उबाठा) चे लवकुश निर्वाण, नगरसेवक प्रदीप तीतीरमारे, विपुल कांबळे, माजी तालुकाध्यक्ष सुनील गिरेपुंजे, भूपेश शेंडे, परवेज आकबानी, विजय सार्वे, पंचायत समिती सदस्य विकास वासनिक, सुनील बांते, रेंगेपार/कोहळी चे सरपंच मनोहर बोरकर, दिनदयाल कठाने, धनपाल बोपचे, अशोक बडवाईक, संजय बोपचे यांचेसह शेकडो कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. या बाईक रॅलीला लाखनी शहरासह मुरमाडी व सावरी येथील नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या