Ticker

6/recent/ticker-posts

एकनाथ शिंदेंनी भाजपच्या दोन्ही ऑपर धुडाकवात हि केली नवी मागणी केली

चित्रा न्युज ब्युरो
मुंबई:-विधानसभेचा निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्री आणि मंत्रीपदावरुन महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेना यांच्यात पेच निर्माण झालाय. विधानसभा निवडणुकीत महायुतीला न भुतो न भविष्य असे यश मिळाले आहे . महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याच्यानंतर मुख्यमंत्रि‍पद कुणाला मिळणार यावर चर्चा सुरु झाली. मुख्यमंत्रिपद भाजपच घेणार आहे अशी चरचा सुरु झाली. आणि त्याबरोबर शिवसेनेकडून देखील मागणी करण्यात आली. पण मुख्यमंत्रीपदासाठी भाजपाच ठाम आहे असे भाजपा कडून सांगण्यात येत आहे. भाजपाकडून मुख्यमंत्रीपदाच्या ऐवजी एकनाथ शिंदेंना दोन ऑफर देण्यात आल्या आहे परंतु ह्या दोघेही ऑफर एकनाथ शिंदे यांनी धुडकावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

भाजपाकडून मुख्यमंत्रीपदाऐवजी शिंदेंना केंद्रात मंत्रिपद आणि राज्यात उपमुख्यमंत्रीपद देण्याची ऑफर देण्यात आली. एकनाथ शिंदे यांनी या दोनही ऑफर धुडकाऊन लावल्या आहेत . उपमुख्यमंत्रीपद आणि केंद्रातील मंत्रिपद एकनाथ शिंदे स्वत: घेणार नाहीत, असे देखील समजतेय.

शिंदेंना जर का मुख्यमंत्रीपद मिळाले नाही, तर एकनाथ शिंदे राज्य मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहणार नसल्याचे देखील बोलले जात आहे . त्यांनी भाजपला तसा कळविल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे . एकनाथ शिंदे हे फक्त पक्षप्रमुख म्हणून काम बघणार असल्याचे समोर आले आहे . त्याशिवाय राज्यात कुणाला उपमुख्यमंत्रीपद देण्यात यावे यासाठी ते दोन नावं महायुतीला सुचविणार आहेत .

एकनाथ शिंदे पक्षप्रमुखाच्या भूमिकेत काम बघणार असल्याचे सूत्रांनी सांगितली आहे . त्याशिवाय शिवसेना नेते एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदासाठी ज्या २ जणांची नावे देणार आहेत, त्यामध्ये एक मागासवर्गीय किंवा मराठा चेहरा असू शकतो, असेही सांगण्यात आलेय.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या