चित्रा न्युज ब्युरो
परभणी : वंचित बहुजन आघाडीचे जिंतूर-सेलू विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सुरेश नागरे यांना अपक्ष उमेदवार अमोल डंबाळे यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे सुरेश नागरे यांचा या मतदारसंघातून विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.
आंबेडकर घराण्याचा मान ठेऊन आणि वंचित बहुजन युवा आघाडीचे नितीन गवळी यांच्या सांगण्यानुसार डंबाळे यांनी माघार घेतली. नागरे हे विजयाच्या जवळ आहेत त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण नको या कारणाने डंबाळे यांनी माघार घेतल्याचे त्यांनी सांगितले आहे.
तसेच, नागरे हे शोषित, पिडीत आणि वंचितांच्या विकासाचे काम करत आहेत. त्यांच्या विजयासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही डंबाळे यांनी म्हटले आहे.
------


0 टिप्पण्या