Ticker

6/recent/ticker-posts

अपघातग्रस्ताच्या मदतीला चक्रधर मेश्राम यांची तात्काळ मदत.


👉 सहकाऱ्यांच्या मदतीने  रुग्णालयात केले दाखल.           
चित्रा न्युज ब्युरो
 ब्रम्हपुरी  :- ब्रम्हपुरी विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतांना मतदानाच्या दिवशी दिनांक २० नोव्हेंबर रोजी  देलनवाडी  कडून  आपल्या दुचाकी वाहनाने येत असतांना  रस्त्यावर चालणाऱ्या चारचाकी वाहनांच्या  लाईटांमुळे समोरचे काही दृश्य दिसेनासे  झाल्यावर राकेश मुळे (३३ वर्षं) संत रविदास चौक यांनी  अचानक आपल्या दुचाकी वाहनाचे ब्रेक  दाबल्याने गाडी जागीच स्लिप झाली.  आणि ते जागीच पडल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोक्याला जखम झाली.  अशातच  ब्रम्हपुरी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेले उमेदवार चक्रधर मेश्राम हे आपल्या सहकाऱ्यांसह  येत असतांना   सदर  अपघातचे दृश्य पाहून  तात्काळ आपल्या वाहनचालकाला  गाडी थांबविण्यास सांगितले आणि स्वतः  आपल्या सहकाऱ्यांसह  राकेश मुळे यांना आपल्या वाहनाने आस्था हाॅस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले.  याप्रसंगी उमेदवार चक्रधर मेश्राम यांचे प्रतीनिधी चिंतामण मेश्राम आणि वाहनचालक यांनी सहकार्य केले. उपचारादरम्यान  त्यांचा डोक्याला जखम झाली असल्याचे दिसून आले असल्याचे सांगून तात्काळ सीटी स्कॅन करण्यासाठी पाठविले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या