Ticker

6/recent/ticker-posts

लाडक्या बहिणींच्या लाटेतही लोकसभेला मिळालेल्या मतांची टक्केवारी विधानसभा निवडणुकीत सुद्धा कायम राखण्यात 'वंचित' आघाडी यशस्वी...


विधानसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वातील वंचित फॅक्टरही काही ठिकाणी चालला असून याचा २० जागांवर सरळ फटका बसला आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या लाटेतही प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने आपला मतांचा टक्का कायम ठेवला असून ही टक्केवारी परिवर्तन आघाडी व मनसेपेक्षा अधिक आहे.  

वंचित बहुजन आघाडी'मुळे 'महाविकास आघाडी'च्या २० उमेदवारांना फारच कमी अंतराने पराभवाचा सामना करावा लागला.यामध्ये राष्ट्रवादीचे (शरद पवार) ८,काँग्रेस ६,शिवसेनेच्या (ठाकरे) ६ आणि एमआयएमच्या दोन उमेदवारांचा समावेश आहे. विधानसभा निवडणुकीत असलेल्या 'लाडक्या बहिणी'च्या लाटेतही लोकसभेला मिळालेला मतांचा वाटा राखण्यात 'वंचित' आघाडी यशस्वी ठरली आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे संदीप नाईक,सतीश चव्हाण,राजेश टोपे,राहुल मोटे,राजेंद्र शिंगणे,फहाद अहमद यांचा अगदी थोड्यात पराभव झाला. तर,काँग्रेसचे वसंत पुरके,दिलीप सानंद,धीरज देशमुख आदि दिग्गज नेत्यांना निसटत्या पराभवाचा सामना करावा लागला.
  
वंचितच्या उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात मते मिळवल्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय गायकवाड आणि तानाजी सावंत यांचा खूपच कमी मतांनी पराभव झाला. तर,दुसरीकडे अतुल सावे, मंदा म्हात्रे, प्रशांत बंब, मेघना बोर्डीकर, आकाश फुंडकर, रमेश कराड या उमेदवारांचा कमी मतांनी विजय झाला. या मतदारसंघात वंचितने घेतलेली मते महायुतीला फायद्याची ठरली.

  अल्पसंख्याकबहुल मतदारसंघात 'वंचित'ने या वेळी मुस्लीम उमेदवार उभे केले होते. यामुळे 'एमआयएम'ला याचा फटका बसला. या पक्षाचे 'औरंगाबाद मध्य'चे इम्तियाज जलील आणि आणि 'औरंगाबाद पूर्व'चे सिद्दीकी नसुरीद्दीन तकुद्दीन या दोन उमेदवारांचा कमी मताधिक्याने पराभव झाला.

सौजन्य :हिंदुस्थान टाइम्स :

शिवानंद सनादे.
मुलुंड मुंबई.
9594818067

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या