रिपब्लिकन कार्यकर्त्यांना राज्यात सत्तेचा वाटा मिळवून देण्यासाठीच महायुतीला रिपब्लिकन पक्षाचा पाठींबा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
चित्रा न्युज ब्युरो
मुंबई : - रिपब्लिकन पक्ष हा महायुती चा प्रमुख घटका पक्ष आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचा महायुतीच्या अधिकृत उमेदवारांना पाठिंबा आहे. माहीम मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार सदा सरवणकर यांना आमचा पाठिंबा आहे.तसेच मानखुर्द- शिवाजीनगर मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार सुरेश उर्फ बुलेट पाटील यांना रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा आहे अशी घोषणा आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी आज पत्रकार परिषदेत केली.गरवारे क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत ना.रामदास आठवले बोलत होते.
रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना राज्यात सत्तेचा वाटा मिळवून देण्यासाठीच आपण रिपब्लीकन पक्षाचा महायुतीला पाठिंबा दिला आहे.मागील अडिज वर्षात रिपब्लिकन पक्षाला सत्तेचा वाटा मिळाला नाही मात्र आता महिन्या भारत निवडणूक कार्यक्रम संपेल आणि पुन्हा महायुती सरकार सत्तेवर येईल.त्यात रिपब्लिकन पक्षाला सत्तेचा वाटा निश्चित मिळेल.रिपब्लिकन पक्षाला विधान परिषद सदस्य ; चार महामंडळाची अध्यक्षपदे; आणि 60 महामंडळ सदस्य पदे; जिल्हा तालुका शासकीय समित्यांची सदस्यपदे रिपब्लिकन कार्यकर्त्यांना देण्यात येईल.आगामी काळात महापालिका निवडणुका ; जिल्हा परिषद पंचायत समिती मध्ये रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी आपले वॉर्ड बांधावेत.स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रिपब्लिकन कार्यकर्त्यांना निश्चित उमेदवारी मिळेल.स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकांतील उमेदवारी जिंकण्याची तयारी आतापासून रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी करावी.त्यामुळे रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी जागा वाटप मधील नाराजी दूर सारून महायुतीच्या अधिकृत उमेदवारांचा प्रचार करावा असे आवाहन ना.रामदास आठवले यांनी केले आहे.
मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीतून आपल्या उमेदवारांची माघार घेतली हा त्यांचा राजकीय सामाजिक दृष्ट्या अत्यंत चांगला आणि दूरदृष्टी असणारा निर्णय आहे.त्यांचे या निर्णयाचे आपण स्वागत करतो केवळ एका समाजाच्या मतावर उमेदवार निवडून येऊ शकत नाहीत.त्यामुळे माघार घेण्याचा त्यांचा निर्णय हा महायुतीचा विजय सुकर करणा


0 टिप्पण्या