Ticker

6/recent/ticker-posts

सरपंच संतोष देशमुख हत्याकांड;वंचितकडून कुटुंबीयांचे सांत्वन

वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट

चित्रा न्युज ब्युरो
बीड : केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे नऊ डिसेंबर रोजी अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली. आज वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र केंद्रीय व प्रदेश पदाधिकारी यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच वंचित बहुजन आघाडी आपल्या पाठीशी असल्याचे सांगितले.

वंचितचे अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या निर्देशानुसार आज राष्ट्रीय सदस्य अशोक सोनोने, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पूंडकर आणि युवा प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी मस्साजोग येथे भेट दिली. सरपंच बंधू धनंजय देशमुख यांच्यासोबत चर्चा केली. त्यांनी अंगावर काटा आणणारा घटनाक्रम विशद केला.

केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे नऊ डिसेंबर रोजी अपहरण करीत क्रूरतेने हत्या केल्याच्या घटनेला आठवडा उलटून गेला आहे. तरीही या प्रकरणातील मुख्य आरोपीसह उर्वरित आरोपींना अद्यापही अटक झाली नाही. या हत्याकांडातील मास्टर माईंडला अद्याप अटक केलेली नाही. त्यामुळे राज्यभर तीव्र असंतोष आहे. जिल्ह्यातील दहशत दूर होण्यासाठी सर्व आरोपी आणि मुख्य सूत्रधार यांना अटक  होणे आणि देशमुख कुटुंबाला न्याय मिळणे गरजेचे आहे. वंचित बहुजन आघाडी देशमुख कुटुंबाच्या पाठीशी असून, वेळ पडल्यास रस्त्यावर उतरू असा इशारा डॉ. पुंडकर यांनी दिला आहे.

या वेळी वंचित बहुजन आघाडीचे
डॉ. नितीन सोनवणे, अजय सरोदे , जिल्हा अध्यक्ष पश्चिम शैलेश कांबळे, जिल्हाध्यक्ष पूर्व, पुरुषोत्तम वीर बीड विधानसभा उमेदवार, बाबूराव मस्के युवा जिल्हाध्यक्ष, लखन जोगदंड शहर अध्यक्ष अन्वर पाशा साहेब, रहमत पठाण साहेब, जोंधळ सर, लिंबराज गायकवाड, श्रीकांत वाघमारे, मिलिंद सरपुते, प्रशांत उघडे तालुका अध्यक्ष, धम्मानंद कासारे, जिल्हा उपाध्यक्ष बीड पूर्व तुषार माने राहुल राऊत, अनिल डोंगरे आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या