Ticker

6/recent/ticker-posts

रब्बी हंगाम २०२४ मध्ये ५ हजार ४६६ हेक्टर क्षेत्रात लागवड

• लाख लाखोरी पिकांना वातावरणाचा फटका

• भाजीपालाजन्य पिकांवर रोग आणि किडीच्या प्रादुर्भावाची शक्यता


कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- लाखनी तालुक्यात खरीप हंगाम संपला असून रब्बी हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र ४ हजार २४० हेक्टर आहे. रब्बी हंगामात अन्नधान्य, कडधान्य, गळीतधान्य, ऊस, चारा पिके भाजीपालाजन्य पिके व मसाला पिकांची लागवड करण्यात येते. त्यापैकी २३ डिसेंबर २०२४ पर्यंत ५ हजार ४६६.५५ हेक्टर क्षेत्रात पेरण्या पूर्ण झाल्या असल्याचे तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या पीक पेरणी अहवालात नमूद असून लाख, लाखोरी व भाजीपालाजन्य पिकांना  वातावरणातील बदलाचा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 
                  साकोली व लाखांदुर तालुक्याचे विभाजन करून लाखनी तालुक्याची निर्मिती करण्यात आली. भौगोलिक क्षेत्र ३४ हजार २४८.५८ हेक्टर असून पेरणीयोग्य क्षेत्र २४ हजार ९६० हेक्टर आहे. त्यापैकी २३ हजार ९०९ हेक्टर क्षेत्रात खरीप पिकांची लागवड करण्यात आली होती. तर ४ हजार २४० हेक्टर क्षेत्रात रब्बी पिकांची लागवड केली जाण्याची शक्यता होती. पण २३ डिसेंबर पर्यंतच्या पीक पेरणी अहवालात ५ हजार ४६६.५५ हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आली आहे. त्यात अन्नधान्य, कडधान्य, गळीतधान्य,  भाजीपाला, मसाला, ऊस आणि चारा पिकांची लागवड करण्यात येते. २३ डिसेंबर पर्यंतच्या पीक पेरणी अहवालात अन्नधान्य पिकात गहु ८२४.७० हेक्टर, ज्वारी ११ हेक्टर, मका ३२७.७० हेक्टर असे एकूण १ हजार १६३.४० हेक्टर, कडधान्यात हरभरा १ हजार १० हेक्टर, लाख, लाखोरी ६९०.९० हेक्टर, उडीद ३८६.७० हेक्टर, मुंग ३८२.२० हेक्टर, वटाणा १०४.७० हेक्टर, पोपट १०१ हेक्टर, मसूर १७६.३० हेक्टर असे एकूण २ हजार ८४१.९० हेक्टर, गळीत धान्यात करडई ४१.४० हेक्टर, जवस १५०.९० हेक्टर, मोहरी १४७.३० हेक्टर, भुईमुंग १०.३० हेक्टर एकूण गळीत धान्य ३४९.९० हेक्टर, मसाला पिकात धने ५५.८० हेक्टर, मिरची २५.८० हेक्टर, कांदा ८ हेक्टर असे एकूण ८९.७० हेक्टर, भाजीपाला जन्य पिके टोमॅटो ४४.७० हेक्टर, वांगी ११२.२० हेक्टर, भेंडी २७८.७० हेक्टर, कोबी ३८.२० हेक्टर, मिरची १०६.३० हेक्टर, चवळी ४० हेक्टर, कोथिंबीर(सांभार) ४६ हेक्टर, पालक ३२.५० हेक्टर, कारले ३२.५० हेक्टर, इतर भाजीपाला ४१.४० हेक्टर असा एकूण भाजीपाला ७७२.५० हेक्टर, ऊस खोडवा ०.८० आर, पूर्व हंगामी ०.६० आर, सुरू ०.४० आर एकूण ऊस १.८० हेक्टर, सोनबोरू ११७.२० हेक्टर, केळी २ हेक्टर, पपई १.१० हेक्टर, चारापिके १२७.२० हेक्टर असे एकुण ५ हजार ४६६.५५ हेक्टर क्षेत्रात रब्बी पिकांची लागवड करण्यात आली असल्याचे तालुका कृषी अधिकारी लाखनी यांचे २३ डिसेंबर पर्यंतचे रब्बी हंगामी पीक पेरणी अहवालात नमूद आहे. वातावरणातील बदलामुळे लाख, लाखोरी व भाजीपालाजन्य पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होऊन नुकसानीची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 


प्रतिक्रिया 
रब्बी हंगाम २०२४-२५ मध्ये २३ डिसेंबर पर्यंत पीक पेरणी अहवालात अन्नधान्य, कडधान्य, भाजीपालाजन्य, गळीतधान्य, मसाला व चारा पिकांची ५ हजार ४६६.५५ हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आली आहे. वातावरणातील बदलाचा फटका लाख-लाखोरी व भाजीपाला पिकास बसू शकतो. 
*सुधीर वरकडे, कृषी अधिकारी, लाखनी*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या