Ticker

6/recent/ticker-posts

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना निष्कासित करा

• भारतीय बौद्ध महासभेचे महामहीम राष्ट्रपतींना निवेदन 

चित्रा न्युज ब्युरो
भंडारा :- संविधान निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबद निंदनीय वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना मंत्रीमंडळातून निष्कासित करण्यात यावे. याकरिता मंगळवार(ता.२४ डिसेंबर) रोजी भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा साकोली चे वतीने तहसीलदार साकोली यांचे मार्फत महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. महामहीम राष्ट्रपती यांचेकडून काय भूमिका घेतली जाते. याकडे आंबेडकरी अनुयायांचे लक्ष लागले आहे. 
                   "अभी एक फॅशन होगया है आंबेडकर-आंबेडकर-आंबेडकर-आंबेडकर-आंबेडकर-आंबेड कर इतने बार भगवान का नाम लेते तो सात जन्मो तक स्वर्ग मिल जाता" असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत जाणूनबुजून संविधान निर्माते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेबाबद अपमानास्पद वक्तव्य केल्याने जगातील अब्जावधी आंबेडकरी अनुयायांच्या भावनांना ठेस पोहचली आहे. गृहमंत्री अमित शहा यांचेकडून तात्काळ माफीनामा घेऊन त्यांना मंत्रीमंडळातून निष्कासित करण्यात यावे. अशी देशविदेशातील अब्जावधी आंबेडकरी अनुयायी आपणाकडून न्यायाची अपेक्षा करीत आहेत. असे निवेदनात नमूद असून भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा साकोली कडून तहसीलदार साकोली मार्फत महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा साकोली चे अध्यक्ष विलास मेश्राम, उपाध्यक्ष अशोक रंगारी, यादोराव गणवीर, मधुकर रामटेके, कार्यालय सचिव पी.एस. बोदेले, संघटक कैलास गेडाम, डी. जी. रंगारी, सचिव विनाताई प्रदीप कऱ्हाडे, सामाजिक कार्यकर्ता अचल मेश्राम, डी. वाय. बडोले यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या असून डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर ट्रस्टी/राष्ट्रीय कार्याध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा यांना निवेदनाची प्रतीलीपी पाठविण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या