वंचितकडून पैठण तहसीलदार यांना निवेदन !
पैठण : बौद्ध गया मंदिर अधिनियम 1949 रद्द करून बौद्धगयेचे महाबोधी महाविहार हे ब्राह्मणी व्यवस्थेच्या ताब्यातून बौद्धांच्या ताब्यात देण्या संदर्भातील निवेदन नायब तहसीलदार बनसोडे यांना देण्यात आले.
पैठण तहसीलदार यांच्यामार्फत देशाचे राष्ट्रपती यांना वंचित बहुजन आघाडी पैठण यांच्याकडून बिहार राज्यातील बोधगयाचे महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी दि.12 फेब्रु. पासून देश विदेशातील बौद्ध भिक्खू व बौद्ध अनुयायी यांचे आंदोलन चालू आहे बोधगया मंदिर अधिनियम 1949 रद्द करून ब्राह्मणी व्यवस्थापन असलेल्या व्यवस्थेच्या विरोधात चालू असलेल्या या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी पाठिंबा दिला आहे या पार्श्वभूमीवर पैठण तालुक्याच्या संपूर्ण बौद्ध जनतेच्या व पक्षाच्या वतीने महामहीम राष्ट्रपती महोदयास बौद्ध गया मंदिर अधिनियम 1949 रद्द करून बौद्धगयेचे महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्याची निवेदन नायब तहसीलदार बनसोडे यांना देण्यात आले.
या वेळी वंचितचे तालुकाध्यक्ष सोमनाथ निकाळजे, भारत आठवले सरचिटणीस भारतीय बौद्ध महासभा, विष्णू वीर उपाध्यक्ष, सतीश बोरुडे, शाहीर सुरेश सदावर्ते, भानुदास चाबुकस्वार, प्रशांत चव्हाण इत्यादींची उपस्थिती होती.
---


0 टिप्पण्या